🟪 मामा

 

🟪 मामा  

वृत्त एकसत्ता न्यूज

संकलन: आकाश भाग्यवंत नायकुडे, मुंबई. 

दिनांक 06/05/2025 :

मामा हा शब्द म्हणजे माया आणि माय यांचा मिलाफ,

एक प्रेमाचा संबंध

कोणतीही आणि कशीही परिस्थिती असो.

मामा भले गरीब असेल पण

मामाचे प्रेम सदैव श्रीमंतच राहणार.

सर्वोतोपरी स्नेह म्हणजे द्विअक्षरीशब्द  मामा

जबरदस्त व्यक्तीमत्व

आईच्या खानदानातील निकटवर्तीय संबध.

आईपेक्षा लहान असो मोठा असो, आई त्याला आदराने भाऊच बोलणार... 

आपल्या आईच्या प्रत्येक हाकेला हातचे कामं सोडून धावत जाणार आणि तिच्या अधिकाराच्या प्रत्येक लढतीसाठी तिच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून तिच्या सासरी झगडणारं व्यक्तीमत्त्व म्हणजे 

मामा.

आपल्याला लहानपणी त्याच्या अंगा खांद्यावर खेळवणारं  खुळं स्वरूप म्हणजे मामा.

आपण जसजसे मोठे होत जातो तसतसं जवळुन निरखून पाहणारं रुप म्हणजे मामा.

आपणं आजोळी जातांना प्रवासात अथवा त्यांच्या घरी रात्रंदिवस कोणताही शारीरिक त्रास सहन करतांना वेदना न दाखवणारं हक्काचे माणुस म्हणजे मामा....

मामाची आठवण येताच मन हळवं झालं नाही असं कधीच घडत नाही.

मामांनी दिवाळीच्या घेतलेल्या कपड्यांची ऐटच न्यारी...हमखास आणि अभिमानाने सांगत असतो हे कपडे मामांनी घेतले.

कपडे खरेदीसाठी जातांना मामाच्या ठरवलेल्या बजेटपेक्षा आपण दुप्पट बजेटचे कपडे घेतले तरी मामा हसतच म्हणणार घेतले तर घेऊ द्या भाच्याचा हक्कच आहे ना, कधीच काटकसर न करणारं उत्साही व्यक्तीमत्त्व म्हणजे मामा.

बालपणी सूट्ट्यामध्ये मामाच्या गावाला जातो तेंव्हा आईच्या नावाने ओळखले जाणारे आपण?

या प्रश्नाचे उत्तर आता मिळालं.

एखाद्या दिवाळीत मामांनी कपडे घेतले नाही तर मामाचं कर्तृत्व  कमी होऊ नये म्हणून आईने पदरमोड करून मामाच्या नावाने आईने कपडे घेऊन दिले असतील पण मामाची शान जाऊ दिली नसेल.

संपूर्ण आयुष्य मुक्त श्वास घेणारी थकलेली  आई भावाच्या आधाराशिवाय आनंदी राहुच शकत नाही.

बहिणीला भाऊ इतका प्रिय असतो त्याचे मोजमाप अजुनही सापडले नाही.

हे फक्त बहीणीला भाऊ झाल्यावरच कळते.

असं हे मामा नावाचं पात्र आपण   लग्नाच्या योग्यतेचे होतो तेंव्हा प्रत्येक ठिकाणी विचारलं जातं मामा कोण आहेत.तेंव्हा आईच्या माहेरच मोठेपण आणि महत्व वाढवतं... 

लग्नाच्या मंडपात जेंव्हा भटजी पुकारतो नवरीचे "मामा" आणि नवरदेवाचे मामा" स्टेजवर या तेव्हा कित्येक रथी महारथींचे डोळे मामाला पहाण्यास उत्सुक असतात तो क्षण औरच असतो...!

लग्नाच्या मंडपात नवरदेव नवरी च्या पाठीशी उभे असलेले मामाच आजीवन साथ देतात, आणि आईने मामाच्या हाताला बांधलेल्या राखी चे कर्ज जीवनभर चुकवतात ते मामाच...!!!

  सर्व मामांना समर्पित 

संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे, मुंबई.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या