💢 मनाची शुद्धता

💢 मनाची शुद्धता

अकलूज वैभव न्यूज नेटवर्क 

वृत्त एकसत्ता न्यूज

संकलन : आकाश भाग्यवंत नायकुडे, मुंबई.

दिनांक 27/5/2025 :

सध्या सर्वत्र जास्त चर्चेत असलेला पण नेहमीचाच विषय म्हणजे, हुंडाबळी. २१ व्या शतकातील २५ वे वर्ष चालू आहे. स्वातंत्र्याची ७८ वर्षे पूर्ण होतील पण आपण अजूनही मागासलेल्या, बुरसटलेल्या व क्रूर मानसिकतेत आहोत.

हुंडा घेणे व देणे हा कायद्याने गुन्हा आहे तरीही राजरोसपणे गरिबांपासून श्रीमंतांपर्यंत सर्वत्र हुंडा दिला व घेतला जातो. वरपक्ष जितका धनवान तितकी मागणी जास्त. वधूपक्ष स्वतःची मजबुरी समजून ऐपत नसली तरी मागणी पूर्ण करत राहतो, मुलीचा जीव वाचवण्यासाठी.

आपण सर्वजण या गोष्टीला जबाबदार आहोत. अशा लग्नातील डामडौल व उधळपट्टी पाहून अचंबित होतो. खरे तर या प्रकाराच्या लग्नांवर आपण बहिष्कार घातला पाहिजे. गर्दी वाढवून त्यांना प्रोत्साहन देणे चुकीचे आहे.

आजचा संकल्प

_आपण प्रत्येकजण हुंडाबळीच्या या दुष्टचक्रातून बाहेर पडू. हुंडा देणार नाही अन् हुंडा घेणार नाही अन् अशा लग्नात आम्ही जाणार नाही अशी शपथ घेऊ._


सौ. स्नेहलता स. जगताप.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या