सहकार महर्षि अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची दिशा कम्प्यूटर्स, अलिबाग बारामती येथे भेट संपन्न

 

सहकार महर्षि अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची दिशा कम्प्यूटर्स, अलिबाग बारामती येथे भेट संपन्न  

 वृत्त एकसत्ता न्यूज 

आकाश भाग्यवंत नायकुडे, मुंबई. 

दिनांक 23/5/2025 :

सहकार महर्षि शंकरराव मोहिते पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड रिसर्च, शंकरनगर-अकलूज या अभियांत्रिकी महाविद्यालयामधील कॉम्पुटर सायन्स अँड इंजिनीरिंग विभागातील  विद्यार्थ्यांना  आयटी क्षेत्रामधील संधी  व तेथील कामकाज कसे चालते हे पाहण्यासाठी  दिशा कम्प्यूटर्स,अलिबाग बारामती येथे औद्योगिक भेट संपन्न झाल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रवीण ढवळे  यांनी दिली.

 त्यामध्ये विद्यार्थ्यांना संपूर्ण  माहिती सेंटर हेड स्नेहल काकड़े यांनी सॉफ्टवेयर डेव्हलपमेंट, एप्लीकेशन डेव्हलपमेंट, वेब डेव्हलपमेंट, इंटर्नशिप बद्दल माहिती दिली. वर्गामध्येशिकलेले ज्ञान व त्याचा कंपनीमध्ये होणारा उपयोग पाहून अभियांत्रिकी शिक्षण घेताना प्रोजेक्ट वर्क करणेसाठी मदत होईल असे मनोगत विद्यार्थ्यांनी व्यक्त केले.

 याप्रसंगी महाविद्यालयाचे कॉम्पुटर सायन्स अँड इंजिनीरिंग विभागाचे विभागप्रमुख प्रा. सचिन पांढरे  व समन्वयक म्हणून प्रा. इंद्रजित इनामदार  यांनी काम पाहिले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या