२६/११ मुंबई दहशतवादी हल्ले वि. पहलगाम — भीषण मौन वि. ऑपरेशन सिंदूर

२६/११ मुंबई दहशतवादी हल्ले वि. पहलगाम — भीषण मौन वि. ऑपरेशन सिंदूर  

वृत्त एकसत्ता न्यूज

संकलन : आकाश भाग्यवंत नायकुडे, मुंबई. 

दिनांक 07/05/2025 :

आज सकाळपासून काही अधू डोक्याच्या पुरोगामी मधूंनी तोडलेले अकलेचे तारे पाहून उदंड करमणूक झाली. कालपर्यंत मॉक ड्रिलची खिल्ली उडवण्यात दंग असलेल्या ह्या अर्धवट लोकांची अवस्था ऑपरेशनसिंदूर मुळे सहन होत नाही आणि सांगताही येत नाही अशी झालेली आहे. ऑपरेशन सिंदूरचा उघड विरोध तर करता येत नाही कारण लोक अगदीच शेण घालतील तोंडात, पण मोदी सरकारला श्रेय तर चुकूनही द्यायचे नाही अश्या कात्रीत सापडल्यामुळे ह्या जमात-ए-पुरोगामीने सर्व श्रेय लष्कराला देणाऱ्या पोस्टींचा पाऊस पाडलाय, जणू काही सैन्यच स्वतःहून LoC पार करायचा, एअर स्ट्राईक करायचा निर्णय घेतं, प्रेस कॉन्फरन्स घ्यायचं ठरवतं. 

असं जर असतं, तर २६/११ २००८ मध्ये मुंबईत जे इतके भयानक पाकिस्तान प्रणित दहशतवादी हल्ले झाले, त्याचे प्रत्युत्तर म्हणून भारतीय लष्कराने एअरस्ट्राईक्स नसते का केले? आपले जवान, आपले लष्कर आणि आपली सैन्यशक्ती तेव्हाही इतकीच सक्षम होती की! 

२६/११ चे मुंबईतले दहशतवादी हल्ले आणि पहलगामचा दहशतवादी हल्ला, तेव्हाचे भीषण राजकीय मौन आणि नेभळटपणा विरुद्ध आता दोन आठवड्यांच्या आत दिलेले ऑपरेशन सिंदूरचे दणदणीत प्रत्युत्तर ह्यात फरक काय? 

फरक आहे राजकीय इच्छाशक्तीचा, सैन्यामागे सर्व शक्तीनिशी ठामपणे उभ्या राहणाऱ्या सशक्त नेतृत्वाचा. ’घरमें घुस के मारेंगे’ म्हणणाऱ्या विजिगिषु वृत्तीचा. 

हे मी म्हणत नाहीये. २६/११ च्या वेळी भारताचे वायुदल प्रमुख असलेल्या एअर चीफ मार्शल फली मेजर यांनी शिव अरूरला बालाकोट एअरस्ट्राईक नंतर दिलेल्या मुलाखतीत हे अगदी थेट आणि स्पष्टपणे सांगितलं होतं की ‘भारताची राजकीय इच्छाशक्ती बदलली आहे.’ त्यांच्यानंतरचे वायुदल प्रमुख बी एस धनोआ ह्यांनी तर व्हीजेटीआय च्या शेकडो विद्यार्थ्यांसमोर स्पष्टपणे सांगितलं होतं की २६/११ नंतर वायुदलाने पाकिस्तानात घुसून तिथले दहशतवादी तळ नष्ट करण्याचा पूर्ण प्लॅन तत्कालीन मनमोहन सिंग सरकारला दिला होता पण आपली आंतरराष्ट्रीय प्रतिमा जपण्यासाठी त्यांनी ह्या प्लॅनला नकार दिला. 

स्वतः कमालीचे कमकुवत, निर्णय घेण्यास अक्षम असे तात्कालिन पंतप्रधान मनमोहन सिंग आणि आपली छबी जपण्याच्या हव्यासात हरवलेल्या सोनिया गांधी ह्यांनी लष्कराला पूर्ण मोकळीक दिली नाही आणि राष्ट्रीय सुरक्षेचं राजकारण केलं. परिणाम काय झाला? आजही आपण २६/११ ला जबाबदार असलेल्या पाकिस्तान मधल्या लोकांना शिक्षा करू शकलेलो नाही. २००८ मध्ये भारताची परिस्थिती आंतरराष्ट्रीय राजकारणात कोणीही यावे, टपली मारून जावे अशीच होती. 

आज परिस्थिती काय आहे? भारताने पाकिस्तानात थेट १०० किमी आत घुसून हल्ले केले, न अमेरिकेने एक चकार शब्द उच्चारला, न इस्लामी देशांनी. युकेबरोबर तर आपण मोठा कालच ट्रेड करार केला आहे. इराण पासून अफगाणिस्तान सारखे इस्लामी कट्टरतावादी देश देखील पाकिस्तानच्या विरोधात आहेत. मोदींचे परराष्ट्र धोरण जर इतके सशक्त नसते तर हे शक्यच नसते, पण सुमार डोक्याच्या कुमार विचारवंतांना हे कोण सांगणार? 

पहलगाम मधल्या पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी हल्ल्यानंतर फक्त एका पंधरवड्यात भारतीय सैन्याने पाकिस्तानात ९ वेगवेगळ्या ठिकाणी घुसून अचूक आणि धीट कारवाई केली तीही केवळ नियंत्रण रेषेपलिकडेच नाही, तर पाकिस्तानी पंजाबमध्ये तब्बल १०० किलोमीटर आत असलेल्या बहावलपूरपर्यंत. हे सारे स्ट्राईक्स प्रिसिजन स्ट्राईक होते, म्हणजे दहशतवादी ट्रेनींग सेंटर नेमके कुठे आहेत ह्याची पक्की माहिती काढून अतिशय नेटकेपणे हे स्ट्राईक्स प्लॅन  केले गेले होते. हे काही एका दिवसात घडत नाही, किंवा फक्त लष्कर हा निर्णय घेत नाही, घेऊ शकत नाही. 

हे एअरस्ट्राईक्स आपले सैन्य किंवा वायुदल अचानक अधिक सक्षम झाल्यामुळे घडले नाहीत. आपले जवान नेहमीच सक्षम होते. फरक इतकाच आहे की आता त्यांच्या पाठीशी खंबीर राजकीय नेतृत्व उभं आहे. ऑपरेशन सिंदूरचे श्रेय फक्त लष्कराचं श्रेय आहे, मोदींचं नाही म्हणणाऱ्या बिनडोक मोदीद्वेष्ट्यांनी जरा स्वतंत्र विचार करण्याची क्षमता विकत घ्यावी. 

फक्त हिंदू पुरुषांना टार्गेट करून २६ हिंदू स्त्रियांना विधवा करणाऱ्या पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर केलेल्या लष्करी कारवाईला मुद्दाम समजून उमजून #OperationSindoor हे नाव देणे, कारवाईची अचूक वेळ, दोन स्त्री ऑफिसर, एक हिंदू आणि एक मुस्लीम यांची पत्रकार परिषदेसाठी निवड करणे, त्यातही नॉन-कॉम्बॅट सिग्नल कोअर शाखेतील कर्नल सोफिया कुरैशी यांची पत्रकार परिषदेसाठी निवड करणे — हे सगळं योगायोगाने झालं असं वाटतंय का? त्याच वेळी, पंतप्रधानांनी स्वतः महिला राष्ट्रपतीना ब्रिफ करायला जाणं, ही काय आपोआप घडून आलेली गोष्ट आहे का? 

ही सर्व उच्च स्तरावर आखलेली एक रणनीती आहे, एका अश्या नेतृत्वाने मांडलेला हा बुद्धिबळाचा डाव आहे ज्याला प्रतिकं, टाईमिंग,  दृश्य परिणाम या सर्वांची जबरदस्त समज आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे नेतृत्व निर्णायक कृती करणारे नेतृत्व आहे, नुसतेच ‘हम देखेंगे, हम करेंगे’ म्हणणारे नेभळट मनमोहन सिंगी नेतृत्व नाहीये हे. 

मोदी सरकारने फक्त सैन्याला मोकळं रान दिलं नाही, तर राजकीय, मुत्सद्दी आणि नैतिक पाठबळ दिलं. जेव्हा एका भारतीय सैनिकाला हा विश्वास असतो की त्याचं नेतृत्व त्याच्या पाठीशी ठामपणे उभं आहे, तेव्हा तो पराक्रमाची शर्थ करतो. 

२००८ मध्ये भारतामध्ये शूर सैनिक आणि लष्करी अधिकाऱ्यांची कमतरता नव्हती तर दिल्लीमध्ये सशक्त आणि खंबीर नेतृत्वाची वानवा होती. 

आज भारताचा पंतप्रधान खंबीर नरेंद्र मोदी आहे, नेभळट मनमोहन सिंग नाही आणि फरक तिथेच आहे, जे एअर चीफ मार्शल फली मेजर आणि धनोआ यांनी स्पष्ट शब्दात बोलून दाखवलेलं आहे. अर्थात ते मोदी द्वेषाने आंधळ्या झालेल्या स्वघोषित विचारवंत लोकांना कळत नाही, किंवा त्यांना ते कळून घ्यायचं नाहीये. देशातल्या सर्वसामान्य नागरिकाला मात्र ते स्पष्ट दिसतंय, कळतंय, जाणवतंय, आणि म्हणूनच दहा वर्षे झाली तरी मोदींचा व्यक्तिगत जनाधार कमी होत नाही, आणि हे तथाकथित विचारवंत लोक मात्र जास्त जास्त इररेलेव्हंट होत चाललेत! 

#OperationSindoor 

शेफाली वैद्य

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या