🟡 मनाची शुद्धता 🔵
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलन : आकाश भाग्यवंत नायकुडे, मुंबई. ( गुप्तकाशी, उत्तराखंड येथून)
दिनांक 17/05/2025 :
सध्या युद्धजन्य परिस्थिती आहे. प्रत्येक भारतीय युद्धाच्या बातम्या ऐकण्यास उत्सुक आहे. पाकिस्तानचे कंबरडे मोडले तरी समाधान वाटत नाही. त्यांचे तुकडे करण्यासाठी आपण प्रत्येकजण उत्सुक आहोत.
आता थोडे आत्मनिरक्षण करू. आपल्या देशातील अंतर्गत शत्रूंचे काय? आपसातील वादाचे काय? जातीपातीचे राजकारण, भ्रष्ट व्यवहार, व्यसनाधिनता, महिला अत्याचार व बरेच काही. जेव्हा बाहेरचा शत्रू संपवावा वाटतो तेव्हा अगोदर आतला संपला पाहिजे.
या प्रसंगानंतर एक लक्षात येते की स्वतःच्या जीवाचा विचार न करता सैन्य शत्रूशी लढत आहे. मात्र देशातील प्रत्येक व्यक्ती आपली आहे. त्यांच्याशी लढायचे कसे? अंतर्गत लढाई तर आपण थांबवली पाहिजे.आपण प्रत्येकजण या विचारातून एकजुटीने राहण्याचा निश्चय करणे गरजेचे आहे.
आजचा संकल्प
_आपण सारे भारतीय बांधव आहोत हे लक्षात घेऊन एकमेकांशी बंधुत्वाने वागू. परस्परांमधील शत्रुत्व नष्ट करू. राजकीय मतभेद बाजूला ठेवून राष्ट्र प्रथम ही भावना ठेवू._
सौ. स्नेहलता स. जगताप

0 टिप्पण्या