मनाची शुद्धता

 

मनाची शुद्धता

वृत्त एकसत्ता न्यूज

संकलन : आकाश भाग्यवंत नायकुडे, मुंबई.

दिनांक 30/5/2025 :

जे होते ते बऱ्यासाठी ही मानसिकता ठेवली तर आपल्याला जीवनाचा आनंद घेता येतो. येणाऱ्या परिस्थितीत कोणत्याही प्रकारची काळजी, चिंता, हळहळ असे करत  मनाला खात न बसता स्वीकारण्याची भूमिका ठेवणे कधीही योग्य.

तसे तर आयुष्यात चढ-उतार येतात, सुख-दुःख, यश-अपयश असे चालूच राहते. कोणतीच स्थिती कायमस्वरूपाची नसते. आलेला क्षण जातो, नव्याने दुसरा येतो. मागच्याच गोष्टी धरून ठेवण्यापेक्षा येतील ते प्रसंग स्वीकारता आले पाहिजेत.

कोणत्याही अपेक्षांचे ओझे न घेता प्रसंगानुरूप हसता-रडता आले पाहिजे. तो प्रसंग मनमोकळा जगायचा, पावसाच्या सरी सारखा. पुन्हा निरभ्र आकाशाप्रमाणे मन मोकळे, हलके झाले पाहिजे.

आजचा संकल्प

आयुष्यात येणाऱ्या प्रसंगांचा मनमुराद आनंद घेऊ, मनाविरुद्ध काही घडले तरी सकारात्मकतेने त्यातून बाहेर पडू व निकोप मानसिक आरोग्य ठेवू.

सौ. स्नेहलता स. जगताप

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या