🟪 आमच्या माता भगिनींचं कुंकू पुसण्याचा परिणाम काय होतो, हे दाखवून दिलं- पंतप्रधान नरेंद्र मोदी 🟦 दहशतवाद्यांना मातीत गाडण्यासाठी आपण भारतीय सैन्य दलास संपूर्ण मोकळीक दिली- पंतप्रधान नरेंद्र मोदी

 

🟪 आमच्या माता भगिनींचं कुंकू पुसण्याचा परिणाम काय होतो, हे दाखवून दिलं- पंतप्रधान नरेंद्र मोदी 

 🟦 दहशतवाद्यांना मातीत गाडण्यासाठी आपण भारतीय सैन्य दलास संपूर्ण मोकळीक दिली- पंतप्रधान नरेंद्र मोदी  

वृत्त एकसत्ता न्यूज

आकाश भाग्यवंत नायकुडे, मुंबई. 

 माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव कोल्हापूर

दिनांक 12/05/2025 :

नवीदिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नियोजित वेळेनुसार आज रात्री 8 वाजता देशवासीयांशी संवाद साधला. त्यामध्ये, भारत पाकिस्तान युद्धजन्य परिस्थिती आणि ऑपरेशन सिंदूरवर भाष्य करताना भारतीय सैन्य दलाच्या शौर्याला सलाम केला. गेल्या काही दिवसांत भारतीय सैन्य दलाने दाखवेल्या शौर्याचा मला अभिमान आहे.  मी भारतीय सैन्य दलास, त्यांच्या शौर्याला आणि प्रत्येक भारतीयांना सॅल्यूट करतो. देशातील प्रत्येक आई, मुलगी आणि लाडक्या बहिणीला मी सलाम करतो. 22 एप्रिल रोजी पहलगाम येथे दहशतवाद्यांनी निष्पाप भारतीयांना धर्म विचारुन ठार मारले. दहशवाद्याचा हा विभत्स चेहरा आहे. दहशतवाद्यांना मातीत गाडण्यासाठी आपण भारतीय सैन्य दलास संपूर्ण मोकळीक दिली होती. आमच्या आया-बहिणीचं कुकूं पुसण्याचा परिणाम काय होतो, हे आम्ही दाखवून दिलं, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ऑपरेशन सिंदूरचं वर्णन केलं.

नमस्कार, आपण सर्वांनी गेल्या काही दिवसांत देशाचं सामर्थ्य आणि संयम पाहिलं आहे. मी सर्वात आधी भारताच्या पराक्रमी सेना, सशस्त्र बल आमच्या गुप्तचर यंत्रणा, वैज्ञानिक यांना प्रत्येक देशवासियांकडून सलाम करतो. आमच्या वीर सैनिकांनी ऑपरेशन सिंदूरच्या लक्ष्याच्या प्राप्तीसाठी असीम शौर्याचं प्रदर्शन केलं. मी त्यांच्या वीरतेला नमन करतो, त्यांचं धाडस, पराक्रम देशाच्या प्रत्येक माता, बहीण आणि मुलीला समर्पित करतो, असं म्हणत नरेंद्र मोदी यांनी भाषणाला सुरुवात केली. 22 एप्रिलला पहलगामध्ये दहशतवाद्यांनी जो निष्ठुरपणा दाखवला होता त्याने देश आणि जगाला धक्का दिला होता. सुट्टी साजरी करणाऱ्या निर्दोष निष्पाप नागरिकांना धर्म विचारुन त्यांच्या परिवारासमोर, मुलांसमोर अतिशय निर्घृणपणे मारुन टाकणं हे दहशतवादाचा बिभत्स चेहरा होता, क्रूरता होती. देशाच्या सद्भावनेला तोडायचा घाणेरडा प्रयत्न होता. माझ्यासाठी वैयक्तिकरित्या ही घटना खूप मोठी होती. या हल्ल्यानंतर संपूर्ण देश, प्रत्येक नागरीक, प्रत्येक समाज, प्रत्येक पक्ष एका स्वरमध्ये दहशतवादविरोधात कडक कारवाईसाठी उभे राहिले. आम्ही दहशतवाद्यांना मातीत गाडण्यासाठी भारतीय सैन्याला पूर्ण सूट दिली. आज प्रत्येक दहशतवादी आणि त्यांची संघटनेला जाणीव झाली आहे की, आमच्या माता, भगिणींच्या माथेवरील सिंदूर हटवण्याचे परिणाम काय होतात, असं नरेंद्र मोदी म्हणाले.

ऑपरेशन सिंदूर हे फक्त नाव नाही. हे देशाच्या कोटी कोटी भावनेचं प्रतिबिंब आहे. ऑपरेशन सिंदूर न्यायाची अखंड प्रतिज्ञा आहे. 7 मे रोजीची सकाळी जगभरातील लोकांनी परिणाम म्हणून पाहिली. पाकिस्तानमधील दहशतवादी प्रशिक्षण केंद्रांवर हवाई दलाने स्ट्राईक केला. दहशतवाद्यांनी स्वप्नातही विचार केला नव्हता की भारत एवढा मोठा हल्ला करेल. पण, राष्ट्र सर्वप्रथम आहे म्हणूनच पोलादी निर्णय आपण घेतल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटले. भारतीय सैन्य दलाने केवळ दहशतवाद्यांचे तळ उध्वस्त केले नाहीत, तर त्यांच्या इच्छाशक्तीवरही प्रहार केला आहे. पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर भारताच्या मिसाईलने हल्ला केला तेव्हा दहशतवादी संघटनेच्या इमारती नाही तर त्यांचं धैर्यही कोसळलं. भावलपूर आणि मुरुदसारखे दहशतवादी ठिकाणी एकप्रकारे ग्लोबल टेररझिमचे युनिव्हर्सिटी राहिले आहेत. जगात कुठेही जे मोठे दहशतवादी हल्ले झाले आहेत, मग ते 9/11 असेल, लंदन ट्यूब बॉम्बिंग असेल किंवा भारतातील मोठमोठे दहशतवादी हल्ले झाले, त्या सर्वांचे तार याच ठिकाणावरुन जुळले आहेत. दहशतवाद्यांनी आमच्या भगिनींच्या माथ्यावरचं सिंदूर नष्ट केलं होतं. त्यामुळे आम्ही दहशतवाद्यांचे हे हेडक्वार्टर नष्ट केले. भारताने 100 पेक्षा जास्त दहशतवाद्यांना मारलं आहे. दहशतवाद्यांचे आका उघडपणे पाकिस्तानात फिरत होते. जे भारताच्या विरोधात कट रचत होते त्यांना भारताने एका झटक्यात संपवून टाकलं, असं नरेंद्र मोदी म्हणाले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या