आकाशात इंद्रधनुष्य कसे तयार होते?
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलन : आकाश भाग्यवंत नायकुडे, मुंबई.
दिनांक 23/5/2025 : आकाशात इंद्रधनुष्य सर्वांनीच पाहिला असेल, पण हा इंद्रधनुष्यट कसा तयार होतो, इंद्रधनुष्यात किती रंग असतात आणि या रंगाचा क्रम काय असतो याबाबत माहिती जाणून घेऊया.
सूर्यप्रकाश जेव्हा पावसाच्या बारीक थेंबांतून जातो, तेव्हा तो अपवर्तन आणि परावर्तनाच्या प्रक्रियेतून विविध रंगात विभागला जातो आणि मग सप्तरंगी इंद्रधनुष्य पाहायला मिळते. अशावेळी पाण्याचे थेंब प्रिझम सारखे काम करत असल्यामुळे प्रकाश वेगवेगळ्या कोनात वळतो आणि रंग तयार होतात आणि एकंदरीत याच प्रक्रियेमुळे आकाशात इंद्रधनुष्य तयार होते. इंद्रधनुष्य हे सात रंगांनी बनलेले असते, म्हणून याला सप्तरंगी इंद्रधनुष्य म्हणतात. सप्तरंगी इंद्रधनुष्यात लाल, नारंगी, पिवळा, हिरवा, निळा, जांभळा आणि गडद निळा हे रंग असतात.
हे सर्व रंग एक विशिष्ट क्रमाने धनुष्यासारख्या आकारात दिसतात. त्यामुळे याला इंद्रधनुष्य म्हणतात. पण सप्तरंगी इंद्रधनुष्यातील रंगांचा क्रम हा Violet, Indigo, Blue, Green, Yellow, Orange, Red असा असतो. इंद्रधनुष्यात तांबडा रंग बाहेरच्या बाजूस व आतील बाजूस क्रमाने नारिंगी, पिवळा, हिरवा, निळा, गडद निळा व जांभळा हे रंग दिसतात. म्हणून इंद्रधनुष्यातील रंगाचा क्रम दर्शवण्यासाठी VIBGYOR हा शब्द नेहमीच वापरला जात असतो.
संकलन : मिलिंद पंडित, कल्याण

0 टिप्पण्या