30 वे. पिठाधिपती रुद्रपशुपती कोळेकर महास्वामीजींचा प्रथम पुण्यस्मरण सोहळा


30 वे. पिठाधिपती रुद्रपशुपती कोळेकर महास्वामीजींचा प्रथम पुण्यस्मरण सोहळा  

 वृत्त एकसत्ता न्यूज 

आकाश भाग्यवंत नायकुडे, मुंबई. 

दिनांक 24/5/2025 :

श्री श्री 108 ष.ब्र. लिंगायत्य गुरुमुर्ती रुद्रपशुपती कोळेकर महास्वामीजी (30 वे. पिठाधिपती) यांचा प्रथम पुण्यस्मरण सोहळा सोमवार दिनांक 2 जून 2025 रोजी संपन्न होणार असून सदर सोहळा दिनांक 31/ 5/ 2025 ते 2/ 6/ 2025 रोजी  तिथीनुसार श्री श्री श्री 108 ष.ब्र. गुरुमुर्ती निर्वाण रुद्रपशुपती महास्वामीजी (31 वे  पिठाधीपती) यांचे नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आलेला आहे.

त्यानिमित्त वैदिक विधी सोहळा पुढील प्रमाणे होईल.

 शनिवार दिनांक 31/ 5 /2025 रोजी पहाटे 5 वा. पासून ब्रह्ममुहूर्तावर अग्रोव्दक पूजा (गंगा आवाहन), पंचाचार्य पूजन, पार्वती परमेश्वर पूजन, नवग्रह पूजा, नांदी पूजा, चतुषष्ठी पूजा, स्वस्ती पूजा, वाचन पूजा, अष्टदीपपालक पूजा, एकादस, रुद्र पूजा, गणेश याग, परमरहस्य ग्रंथ वाचन.

सायं.7 वा.पासून भजन कार्यक्रमात महिला भजनी मंडळ कोळे व वीरशैव भजनी मंडळ नाझरे तर ऋ शि.भ.प. हनुमंत कोरे महाराज यांचे कीर्तन होईल. 

रविवार दिनांक  01/06/2025 सायंकाळी 7 वा. पासून रुद्र याग, होम हवन, परमरहस्य ग्रंथ वाचन समाप्ती नंतर भजन कार्यक्रमात मस्तान भजनी मंडळ मंगळवेढा व वीरशैव भजनी मंडळ नाझरे यांची भजनसवा तर  शि.भ. प. राजेश्वर स्वामी लाळेकर यांचे किर्तन होईल. सोमवार दिनांक 2/6/2025 रोजी सकाळी दहा वाजले पासून ब्रह्ममुहूर्तावर श्रींच्या समाधीस लघुरुद्राभिषेक, प्राणप्रतिष्ठापना, मंगल आरती नंतर महाप्रसाद होईल. दिव्यसानिध्य पौराहित्य श्री श्री श्री 108 ष. ब्र. धर्मरत्न गुरुलिंग शिवाचार्य महास्वामीजी चिटगुपा आज्नेय शास्त्री पुराणिक व सहकारी. 

मृदुंग वादक : शि.भ. प. कृष्णा भोसले, हार्मोनियम शिवभक्त परायण मल्लिकार्जुन मुत्कापुरे. गायक :  शि.भ. प. कपिल करंजीकर, शि. भ. प. अशोक चवरे आळंदीकर.

याप्रमाणे चालणाऱ्या सोहळ्यास हजर राहून गुरु आशीर्वाद असा लाभ घ्यावा असे आवाहन वीरशैव लिंगायत समाज व ग्रामस्थ कोळे आणि श्री गुरुमुर्ती रुद्रपशुपती लिंगायत मठ संस्थान यांच्यावतीने करण्यात आले आहे. हा सोहळा गुरूगादी मठ कोळे तालुका सांगोला जिल्हा सोलापूर इथे आयोजित केलेला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या