🟪 आजचा कळीचा प्रश्नः जातीअंत की जाती पुरूज्जीवन?
(भाग-3)
वृत्त एकसत्ता न्यूज
अकलूज दिनांक 19/5/2025 :
कांशीराम यांच्या पक्षात अनेकठ ओबीसी आमदार व काही ओबीसी खासदार होते. आपल्याच पक्षाच्या ओबीसी नेत्यांच्या नेतृत्वाखाली अब्राह्मणी प्रतिकांच्या मिवणूका उत्तर भारतातून काढता आल्या असत्या. त्यामुळे रामाच्या नावाने बहुजनांचे एकतर्फी होत असलेले ब्राह्मणीकरण काही अंशी थोपवता आले असते. परंतू कांशीरामसाहेब ना फुलेवादी होते ना आंबेडकरवादी! केवळ दोन-तीन जातींचे गठजोड तयार करून राजकिय सत्ता मिळविणे, एवढाच त्यांचा उद्देश होता. त्यासाठी त्यांनी कधी कॉंग्रेस, कधी भाजपा तर कधी सरळ ब्राह्मण जातीशी एकतर्फी दोस्ती1 केली. त्याचे परिणाम पुढे काय झालेत ते आज आपण बसपाच्या अधःपतनातून पाहात आहोतच.
======================
(चेन्नई, तामीळनाडू येथे 1मे 22 रोजी संपन्न झालेल्या सामाजिक न्याय परीषदेत निमंत्रित वक्ते प्रा. श्रावण देवरे यांचे भाषण झाले. या इंग्रजी भाषणाचा मराठी अनुवाद लेखस्वरूपात देत आहोत. कार्यक्रमात वेळेचं बंधन असल्याने भाषण संक्षिप्तच करावे लागते. मात्र अनेक हिचिंतकांनी विनंती केली की, हे भाषण लेखस्वरूपात सविस्तर लिहावे. त्यांच्या विनंतीवरून हे भाषण विस्तारीत केले असून आपल्या वाचकांसाठी सादर करीत आहे. - भाग्यवंत लक्ष्मणराव नायकुडे, संस्थापक संपादक.)
======================
मद्रास प्रांतातील ओबीसी नेते सामी पेरियार हे फुलेवादी होते. त्यांनी तात्यासाहेब महात्मा फुलेंच्या ‘‘ब्राह्मणी-अब्राह्मणी’’ वादाला निरिश्वरवादाची झालर लावुन विकसित केले व अब्राह्मणी क्रांती यशस्वी केली. त्यांनी ‘‘The Ramayana: A true reading’’ (सच्ची रामायण) हा महाग्रंथ लिहून ब्राह्मण संस्कृतीच्या विरोधात मोठी चळवळ उभी केली. ब्राह्मणी रामाला खलनायक सिद्ध करून रावणाला बहुजनांचा नायक व आदर्श राजा असल्याचे सिद्ध केले. या सांस्कृतिक प्रबोधनामुळे जनतेचा प्रचंड पाठिंबा मिळाला, ज्यामुळे त्यांचा द्रमुक पक्ष प्रचंड बहुमताने कायमचा सत्तेवर आला आहे. कांशिराम यांच्या काळात उत्तर भारतात दुसरा सामी पेरियार जन्माला आला. उत्तर भारतातील ओबीसी नेते व विचारवंत ललईसिंह यादव यांनी पेरियारजींचे इंग्रजी पुस्तक हिंदीत "सच्ची रामायण" या नावाने 1968 साली प्रकाशित केले व ब्राह्मणी रामाविरोधात सांस्कृतिक संघर्ष सुरू केला. उत्तर प्रदेश सरकारने 1969 मध्ये या पुस्तकाच्या सर्व प्रती जप्त केल्या आणि पुस्तकावर बंदी घातली. हा सांस्कृतिक संघर्ष उत्तर भारतात दीर्घकाळ चालू होता. हा सांस्कृतिक संघर्ष अलाहाबाद उच्च न्यायालय आणि नंतर सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहोचला. 16 सप्टेंबर 1976 रोजी पुस्तकाच्या बाजूने निकाल देण्यात आला. सर्वोच्च न्यायालयाने पुस्तकावरील बंदी उठवण्याचे आणि जप्त केलेली सर्व पुस्तके परत करण्याचे आदेश दिलेत. देशपातळीवर सुरू असलेल्या या ब्राह्मणी-अब्राह्मणी संघर्षाच्या काळातच (1968-1978) कांशीराम साहेब, खापर्डे साहेब व दिना भाना साहेब यांनी BAMCEF नावाची संघटना स्थापन करून देशभर अभ्यास शिबिरे (Cader Camp) घेण्यास सुरुवात केली. दक्षिणेतील पेरियार व उत्तरेतील ललईसिंह यादव या दोन ओबीसी नेत्यांचा आदर्श घेऊन त्यांनी केलेला अब्राह्मणी संघर्ष कांशीराम-खापर्डे यांनी केडर कॅम्पमध्ये शिकविला असता तर आज कांशीरामजींची बहुजन समाज पार्टी सत्तेत दिसली असती.
बहुजन समाज पक्षाची स्थापना 1984 मध्ये केल्यानंतरही कांशीरामजी स्वतः देशभर केडर कॅम्प घेत असत. मी त्यांच्या कॅडर कॅम्पला हजेरी लावली आहे. या केडर कॅम्पमधून बहुजन समाज पक्षाचा विस्तार देशभर सुरू होता. संघ-भाजपने 1984 पासूनच राम मंदिरासाठी ब्राह्मणी कुप्रबोधनाची मोहिम देशभर सुरू केलेली होती. त्याचवेळी कांशीराम साहेबांचे कॅडर कॅम्पही जोरात सुरू होते. पण कांशीरामजींच्या शिबिरात केवळ 15-85, आरक्षण, वर्ण-जाती रचना, ब्राह्मणवाद विरोध याच मुद्द्यांवर चर्चा होत होती. संघ-भाजपच्या राममंदिराच्या सांस्कृतिक मुद्द्याबाबत कांशीरामजींच्या केडर कॅम्पमध्ये एका शब्दानेही चर्चा होत नव्हती. रामाविरुद्ध सीता व शंबुक यांनी दिलेला सांस्कृतिक संघर्ष व परशूराम-कृष्ष्ण-द्रौणाचार्या या ब्राह्णी प्रतिकांविरोधात एकलव्य-कर्णाने दिलेला संघर्ष, तसेच आर्य-ब्राह्मण वामनाविरोधात बळीराजाने केलेले महायुद्ध इत्यादी प्रकारचे ब्राह्मणी-अब्राह्मणी संघर्षाचे योग्य ते शिक्षण या केडर कॅम्प्समध्ये देणे आवश्यक होते, जे कधीच दिले गेले नाही. तात्यासाहेब महात्मा फुले यांनी ‘गुलामगिरी’ व ‘शेतकर्याचा असूड’ या ग्रंथांमधून अशा प्रकारच्या सांस्कृतिक संघर्षाची मांडणी केलेली आहे. तात्यासाहेबांच्या याच ब्राह्मणी-अब्राह्मणी सिद्धांताचा विकास करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ‘रिडल्स इन हिन्दूझम’ हा महान ग्रंथ लिहीला व सांस्कृतिक संघर्ष अधिक तीव्र करून टोकदार केला. पेरियारसाहेबांनी तर ‘‘सच्ची रामायण’’ लिहून ब्राह्णांना भर चौकात ओढून आणले व मैदानी लढाईचे आव्हान दिले. ही सांस्कृतिक लढाई यशस्वी करून पेरियार यांनी तामीळनाडू राज्यात ओबीसी-बहुजनांचा पक्ष कायमचा सत्तेत बसविला. कांशीरामजी खरे फूले-आंबेडकरवादी असते तर त्यांनी आपल्या केडर कॅम्प्स मध्ये आपल्या महापुरूषांनी लिहिलेले हे चारही ग्रंथ शिकविले असते. असे प्रशिक्षण मिळाल्यावर बसपाच्या नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी उत्स्फुर्तपणे अडवाणीच्या रामरथ यात्रेविरोधात सीता, शंबुक, एकलव्य, बळीराजा, रावण आदि अब्राह्मणी प्रतिकांच्या मिरवणूका देशभर काढल्या असत्या व रामाच्या नावाने चाललेले एकतर्फी ब्राह्मणी आक्रमण रोखले गेले असते. तामीळनाडूच्या पक्षाप्रमाणे बसपा देशावर राज्य करतांना दिसला असता.
सांस्कृतिक संघर्षाशिवाय केलेले कोणतेही राजकारण तुम्हाला ‘कुणाचे तरी शेपूट वा गुलाम’ बनवत असते. कांशिराम यांचा बहुजन समाज पक्ष, रामविलास पास्वान यांचा ‘लोकजनशक्ती पक्ष’ बाळासाहेब प्रकाश आंबेडकरांचा ‘वंचित पक्ष’ व रामदास आठवलेंचा ‘रिपब्लीकन’ हे चारही पक्ष आज भाजपाचे ‘‘दलित सेल किंवा B-Team’’ बनले आहेत. महादेव जानकर यांचा तथाकथित ओबीसी पक्ष (रासपा) हा नेहमीच भाजपाचे शेपूट म्हणून मिरवित असतो. एकेकाळी ‘‘ओबीसींचा ढाण्या वाघ’’ म्हणून प्रसिद्ध असलेले छगन भुजबळ यांची अवस्था आज फडणवीस-अजित पवारांच्या गोठ्यातील खुट्यावर बांधलेल्या शेळीसारखी झालेली आहे. आणी हे सर्व घडते आहे ते केवळ फुले+पेरियार+आंबेडकरप्रणित अब्राह्मणी सांस्कृतिक संघर्ष टाळल्यामुळेच!
(अपूर्ण)
वक्ते- प्रा. श्रावण देवरे,
नाशिक, महाराष्ट्र

0 टिप्पण्या