सहकार महर्षि कारखाना गळीत हंगाम 2024-2025 मधिल ऊस तोडणी वाहतूक वाटखर्ची व डिपॉझीट रक्कम तोडणी वाहतूक कंत्राटदार यांचे खातेवर वर्ग...
वृत्त एकसत्ता न्यूज
आकाश भाग्यवंत नायकुडे, मुंबई.
दिनांक 26/5/2025 :
शंकरनगर - अकलूज (तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर, महाराष्ट्र राज्य.) येथील सहकार महर्षि शंकरराव मोहिते-पाटील सहकारी साखर कारखान्याचे गळीत हंगाम 2024-2025 मधील ऊस तोडणी वाहतूक कंत्राटदार यांची ऊस तोडणी वाहतूक वाटखर्ची व डिपॉझीट रक्कम आदा करणेत आली असल्याची माहिती कारखान्याचे चेअरमन जयसिंह शंकरराव मोहिते-पाटील यांनी दिली.
कारखान्याचे मार्गदर्शक संचालक व महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह शंकरराव मोहिते-पाटील यांचे कुशल मार्गदर्शनाखाली व चेअरमन जयसिंह शंकरराव मोहिते-पाटीलसाहेब यांचे नेतृत्वाखाली कारखाना प्रगतीपथावर वाटचाल करीत आहे.
गळीत हंगाम 2024-2025 मध्ये सभासद, बिगर सभासद, दिर्घमुदत करारदार यांच्या गळीतास आलेल्या ऊसाची बिले शासनाच्या धोरणानुसार ज्या-त्या पंधरवड्यामध्ये त्यांच्या बँक खातेवर वर्ग करणेत आली आहेत. तसेच ऊस तोडणी वाहतूक कंत्राटदार यांची ऊस तोडणी वाहतूकीची संपुर्ण बिले दि.22/03/2025 रोजी आदा करणेत आली आहेत.
ऊस तोडणी वाहतूक कंत्राटदार यांची वाटखर्ची व डिपॉझीट रक्कम सोमवार दि.26/05/2025 रोजी बँक खातेवर वर्ग करणेत आली आहे.
गळीत हंगाम 2025-2026 करीता बैलगाडी, बजाट, ट्रक, ट्रॅक्टर व ऊस तोडणी यंत्राचे मालक व ठेकेदार यांनी जास्तीत जास्त तोडणी वाहतूकीचे करार करून गाळप हंगाम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन कारखान्याचे कार्यकारी संचालक राजेंद्र केरबा चौगुले यांनी केले.
0 टिप्पण्या