🟩 आता या पतित पावन मंदिराला टाळे ठोका
(लेख क्रमांक 1)
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलन : आकाश भाग्यवंत नायकुडे, मुंबई.
दिनांक 29/5/2025 :
प्रस्तुत लेख लिहिताना माझ्या मनाला अतिशय क्लेश होत आहेत. वयाच्या दहाव्या वर्षापासून ते वयाच्या 35 व्या वर्षापर्यंत मी संघ परिवारातील निरनिराळ्या संघटनातून काम केले आहे.
1985 साली मी माझ्या कौटुंबिक जबाबदाऱ्या व पक्षकार्यापेक्षा पक्षकार यांना महत्त्व दिले व व्यावसायिक जबाबदारी पूर्ण वेळ पूर्ण क्षमतेने पार पाडता यावी म्हणून सार्वजनिक व राजकीय जीवन यापासून स्वतःला दूर केले.
माझी प्रतिज्ञा
पण त्यावेळी मी मनोमन प्रतिज्ञा केली कोणत्याही किमतीला संघ , संघ परिवार व संघ परिवारातील कोणीही लहान मोठी व्यक्ती याच्याबद्दल जाहीर किंवा खाजगी रित्या टीकात्मक बोलायचे नाही व वागायचे नाही. पण आज नाईलाजाने माझी प्रतिज्ञा मला मोडावी लागत आहे.
धुळे येथील धबाड
चार दिवसांपूर्वी धुळे येथील सरकारी विश्राम धामात जिथे आमदारांची एक समिती कामासाठी उतरली होती. तेथे जवळजवळ दोन कोटी रुपयांचे घबाड सापडले.
हे घबाड माझे मित्र की जे माझ्याबरोबर भारतीय जनता पक्षात पूर्ण क्षमतेने काम करत होते व आता ऊबाठासेनेत आहेत त्या अनिल गोटेनी हे कॅश कांड पकडून दिले आहे.
मुख्यमंत्री यांची घोर प्रतीज्ञा
ही बातमी पसरताच आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अतिशय ठामपणे या कांडाची चौकशी करणार, एसआयटी नेमणार व दोषी व्यक्तींना गजा आड करणार अशी ताबडतोब प्रतिक्रिया दिली व त्याप्रमाणे कार्यवाही सुरू केली. प्रथम अनिल गोटे यांचे अभिनंदन व नंतर देवेंद्र फडवणीस यांचे अभिनंदन.
आणखीन एका पुस्तकाचा जन्म व राजकीय पुर्नवसन
आता एसआयटी नेमणार म्हणजे पोलीस अधिकारी व तपासी अधिकारी हे तपास करणार जे आमदार व त्या समितीचे सदस्य आहेत या सर्वांची कसून तपासणी होणार त्यांना प्रसंगी अटक होणार त्यांच्यावर खटले भरले जाणार नामवंत सरकारी वकील यांची नेमणूक होणार त्यांना जामीन मिळू नये म्हणून प्रयत्न केले जाणार यामध्ये तपासी अधिकारी सरकारी कर्मचारी व सरकारी वकील यांचा कस लागणार
आपण दररोज इडी आयकर खाते तपासणी तपास खाते यांच्या अधिकाऱ्यांच्या कारवाया देशभर पाहत असतो खरोखरच हे अधिकारी कोणत्याही राजकीय पक्षाच्या नेत्याला अटक करताना निर्भयपणा दाखवतात. पण नंतर होते काय हे राजकीय नेते काही दिवस तुरुंगात राहतात बाहेर आल्यावर त्यावर पुस्तके लिहितात व आपण लाचखोरीबद्दल अटकेत नव्हतो तर देशभक्ती केल्यामुळे अटकेत होतो असा आव आणतात व त्यानंतर या राजकीय नेत्यांची जामीना वर बाहेर आल्यावर त्याचे राजकीय पुर्नजीवन करण्यात येते. त्यांना सरकारात निरनिराळी सत्तेची पदे मिळतात व त्यांनी केलेल्या भ्रष्टाचारावर पांधरुण घातले जाते. असे होत आहे की नाही?
माॅरल घुळीस मिळणार
यामध्ये त्यांना अटक करणाऱ्या, त्यांचा तपास करणाऱ्या, त्यांच्यासाठी सरकारची बाजू मांडणाऱ्या सरकारी वकील या सर्वांची मॉरल काय राहत असेल. त्यांनी कोणाकडे पाहून आपला तपास करायचा? तपासी अधिकारी निस्पृह असावा, सरकारी वकील निस्पृह असावा, न्यायाधीश निस्पृह असावा व या भ्रष्टाचारी नेत्याना गजाआड कायमची ठेवण्यात यावे अशी सर्वसामान्यांची व कायद्याची इच्छा असताना यांचे जामीन होतात व यांना पुन्हा मंत्रीपदे मिळतात ते मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीला खुर्ची लावून बसतात व यांना अटक केलेले तपासी अधिकारी याना सॅल्यूट मारतात यांच्या बंदोबस्तात राहतात. हे कुठेतरी थांबले पाहिजे
प्रस्तुत लेख एका भागात लिहून पूर्ण होणार नाही. "आज पतित पावन मंदिरे बंद करा, त्यांना टाळे लावा." असे नाईलाजाने म्हणावे लागत आहे. या भ्रष्टाचारी नेत्याना यांना पावन करून घ्यायचे बंद करा.
लेखांक एक.
ॲड. अनिल रुईकर
98 232 55 049
इचलकरंजी
0 टिप्पण्या