🟣 शिक्षण प्रसारक मंडळ अकलूजचा 12 वी चा निकाल 95.71 टक्के

🟣 शिक्षण प्रसारक मंडळ अकलूजचा 12 वी चा निकालस 95.71 टक्के 

वृत्त एकसत्ता न्यूज

आकाश भाग्यवंत नायकुडे, मुंबई. 

दिनांक 06/05/2025 : माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळ पुणे यांच्या वतीने फेब्रुवारी, मार्च 2025 मध्ये घेण्यात आलेल्या 12 वी परीक्षेचा शिक्षण प्रसारक मंडळ अकलूज चा निकाल 95.71 टक्के लागला.

       संस्थेच्या सात शाखेतून विज्ञान, कला, वाणिज्य व व्यवसाय अभ्यासक्रम यातून एकूण 1632 विद्यार्थी परीक्षेला बसले. यापैकी 1562 विद्यार्थी उत्तीर्ण झाले.

             संस्थेत सदाशिवराव माने विद्यालयातील वाणिज्य शाखेचा चि. वरद नितीन कोतमीरे यांने 600 पैकी 539 गुण व 89.83% मिळवीत प्रथम क्रमांक पटकावला. तर कर्मवीर बाबासाहेब पाटील विद्यालय व ज्यु. कॉलेज सदाशिवनगर ची  कु. मनाली मनोहर भुजबळ हिने 600 पैकी 537 गुण व 89.50% मिळवीत द्वितीय क्रमांक पटकावला.सदाशिवराव माने विद्यालयाची विज्ञान शाखेची कु. क्रांती कल्याण पांढरे हिने 600 पैकी 534 गुण व 89 टक्के मिळवीत तृतीय क्रमांक पटकावला.

             संस्थेच्या सदाशिवराव माने विद्यालय अकलूज येथून विज्ञान, कला, वाणिज्य व व्य.अभ्यासक्रम या शाखेतून 586 विद्यार्थी परीक्षेला बसले यापैकी 576 विद्यार्थी उत्तीर्ण होऊन शाखेचा निकाल 98.29% लागला.

 यशवंतनगरच्या महर्षि शंकरराव मोहिते प्रशालेतून विज्ञान, कला, व्य. अभ्यासक्रमातून 241 विद्यार्थी पैकी 232 उत्तीर्ण होऊन निकाल 96.27% लागला.

 अकलूजच्या शंकरराव मोहिते महाविद्यालयातून विज्ञान, कला, वाणिज्य, व्य. अभ्यासक्रमातील 394 पैकी 378 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. व निकाल 95.94 टक्के लागला.

 सदाशिवनगरच्या कर्मवीर बाबासाहेब पाटील विद्यालय व ज्यू. कॉलेज मधील विज्ञान, कला, वाणिज्य शाखेतून 160 पैकी 157 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. व निकाल 98.13 टक्के लागला.

 अकलूजच्या जिजामाता कन्या प्रशालेतून विज्ञान शाखेतील 136 पैकी 136 विद्यार्थी उत्तीर्ण होऊन निकाल 100 टक्के लागला.

 वेळापूरच्या सहकार महर्षि शंकरराव मोहिते पाटील विद्यालयातून कला विभागात 88 पैकी 58 विद्यार्थी उत्तीर्ण होऊन निकाल 65.91टक्के लागला.

 नातेपुते येथील श्रीमती रत्नप्रभादेवी मोहिते पाटील विद्यालय व ज्यु. कॉलेज येथील कला शाखेतून 27 पैकी 25 विद्यार्थी उत्तीर्ण होऊन निकाल 92.59 लागला.

या यशाबद्दल संस्थेचे जेष्ठ मार्गदर्शक संचालक जयसिंह मोहिते पाटील, अध्यक्ष संग्रामसिंह मोहिते पाटील, संचालिका कु. स्वरूपाराणी मोहिते पाटील, सचिव अभिजीत रणवरे, सहसचिव हर्षवर्धन खराडे पाटील, सर्व संचालक मंडळ, विविध शाखेचे पदाधिकारी यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.

पैकीच्या पैकी गुण मिळवणारे विद्यार्थी याप्रमाणे----                    कु. मुस्कान युनूस सय्यद, पशुविज्ञान व दुग्ध व्यवसाय विषयात २०० गुण .कु.अंकिता विलास सांगवे, कृषी विज्ञान व तंत्रज्ञान विषयात 100 गुण  (दोन्ही विद्यार्थी सदाशिवराव माने विद्यालय अकलूज), कु. तक्षशिला नितीन दळवी, कृषी विज्ञान व तंत्रज्ञान विषयात 100 गुण.( जिजामाता कन्या प्रशाला अकलूज)

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या