🟧 श्रीनाथ विद्यालय व ज्युनियर कॉलेज माळशिरस विद्यालय बारावी 100% निकालाची परंपरा कायम

🟧 श्रीनाथ विद्यालय व ज्युनियर कॉलेज माळशिरस विद्यालय  बारावी 100% निकालाची परंपरा कायम   

वृत्त एकसत्ता न्यूज

माळशिरस /प्रतिनिधी दिनांक 05/05/2025 :

श्रीनाथ विद्यालय व ज्युनियर कॉलेज माळशिरस या विद्यालयाने दरवर्षी प्रमाणे बारावी 100% निकालाची परंपरा कायम राखली. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांच्यामार्फत फेबु/मार्च 2025 मध्ये घेण्यात आलेल्या बारावी वर्गाचा निकाल सलग आठव्या वर्षी 100% लागला.यामध्ये सायन्स शाखा प्रथम अनुष्का केदारी (91.67), द्वितीय नम्रता आलदार (86.50), तृतीय दिपाली दणाने (86.33). वाणिज्य शाखा प्रथम अंकिता मदने (78.83), द्वितीय गायत्री इंगळे (72.50), तृतीय आदित्य सोनटक्के (72.33). कला शाखा प्रथम अंकिता धांईंजे (80.17), द्वितीय प्रणाली वायदंडे (74.00), तृतीय गायत्री बडवे (70.50), 

 संस्थाध्यक्ष डॉ. आप्पासाहेब देशमुख, सर्व संचालक मंडळ यांच्याकडून  शुभेच्छा देण्यात आल्या. तसेच उत्कृष्ट निकालाची पंरपंरा जोपासली म्हणून प्राचार्य योगेश गुजरे, मुख्याध्यापक मधुकर गुंड, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालक यांचे कौतुक करुन पुढील वाटचालीसाठी प्रोत्साहन दिले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या