🟣 सद्गुरु श्री श्री साखर कारखाना ऊस तोडणी वाहतूक करार शुभारंभ संपन्न 🟢 "10 लाख मे.टन ऊस गाळपाचे उद्दीष्ट" - बाळासाहेब कर्णवर पाटील

🟣 सद्गुरु श्री श्री साखर कारखाना ऊस तोडणी वाहतूक करार शुभारंभ संपन्न

🟢 "10 लाख मे.टन ऊस गाळपाचे उद्दीष्ट" - बाळासाहेब कर्णवर पाटील  

वृत्त एकसत्ता न्यूज

आकाश भाग्यवंत नायकुडे, मुंबई. 

दिनांक 11/05/2025 : सद्गुरु श्री श्री साखर कारखाना लि.  राजेवाडी या कारखान्याच्या गळीत हंगाम 2025 - 26 करीता ऊस तोडणी वाहतूक करार शुभारंभ बुधवारी   कारखान्याचे व्हॉइस चेअरमन  बाळासो कर्णवर पाटील व संचालिका सौ. उषा मारकड यांचे शुभहस्ते कारखाना कार्यस्थळावर संपन्न झाला. 

हंगाम 2025 - 26 करीता कारखान्याने 10 लाख मे.टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट  ठेवले असून जास्तीत जास्त वाहतूक कंत्राटदारांनी करार करावेत व सक्षम तोडणी मजूर हजर करावेत तसेच कार्यक्षेत्रातील सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी आपले कारखान्यास ऊस गाळपासाठी पाठवावा असे आवाहन केले याप्रसंगी कारखान्याचे व्हॉइस चेअरमन बाळासाहेब कर्णवर पाटील यांनी केले. सौ. मारकड  यांनी गुरूपुजा करून सर्वांना आर्ट ऑफ लिव्हिंग बाबत व आनंदी जगण्याबाबत मार्गदर्शन केले. 

कारखान्याने हंगाम 2024-25 मधील सर्व ऊस वाहतूक कंत्राटदारांची फायनल देय बिले अदा केली असून धोरणाप्रमाणे सर्व वाहतूक कंत्राटदारांनी करार जोडणी करून घ्यावी असे आवाहन कारखान्याचे केन मॅनेजर  सुनील सावंत यांनी केले. या प्रसंगी कारखान्याचे जनरल मॅनेजर  सत्यनारायण रेड्डी, डेप्युटी जनरल मॅनेजर  भगवान पाटील  , मुख्य शेतकी अधिकारी दत्तात्रय क्षिरसागर, ऊस पुरवठा अधिकारी विलास पिसे, नेताजी खोत व मोठ्या संख्येने ऊस वाहतूक कंत्राटदार उपस्थित होते.  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  नेताजी खोत  तर आभार विलास पिसे यांनी मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या