🟣 मेंढपाळांची तक्रार तातडीने दाखल करून घेण्याबाबत विशेष पोलीस महानिरीक्षकांचे आदेश. 🟠 यशवंत क्रांती च्या माध्यमातून संजय वाघमोडे यांनी केला होता पाठपुरावा.

 🟣 मेंढपाळांची तक्रार तातडीने दाखल करून घेण्याबाबत विशेष पोलीस महानिरीक्षकांचे आदेश.

   🟠 यशवंत क्रांती च्या माध्यमातून संजय वाघमोडे यांनी केला होता पाठपुरावा.

वृत्त एक सत्ता न्यूज 

आकाश भाग्यवंत नायकुडे 

मुंबई दिनांक 16/4/2025 :

'यशवंत क्रांती' संघटनेच्या च्या निवेदनाची तातडीने दखल घेऊन मेंढपाळ  तक्रार घेऊन आल्यास तात्काळ गुन्हा दाखल करून घेण्याबाबत कोल्हापूर परिक्षेत्र कोल्हापूर चे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनिल फुलारी  यांनी आदेश काढले आहेत. याबाबत संजय वाघमोडे यांनी यशवंत क्रांती संघटनेच्या माध्यमातून पाठपुरावा केला होता. 

    गेल्या दोन-तीन वर्षात कोल्हापुर, सांगली,, सातारा, सोलापूर, जिल्ह्यासह  कोल्हापूर महासंचालक परिक्षेत्र कार्यक्षेत्रात  शेळ्यामेंढ्या चोरीला जाण्याचे प्रमाण वाढले आहे. याबाबत आपल्या कार्यक्षेत्रातील प्रत्येक पोलीस ठाण्यात दोन-तीन  गुन्हे नोंद आहेत. परंतु यातील कोणत्याही चोरीच्या गुन्ह्यातील आरोपी सापडलेले नाहीत व चोरीला गेलेल्या शेळ्या मेंढ्या मालकांना परत मिळालेल्या नाहीत. किंवा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला  नाही. शेळ्या मेंढ्यांची चोरी झाल्यानंतर मेंढपाळ जवळच्या पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी गेल्यावर त्यालाच थांबवून ठेवले जाते. व चोर असल्यासारखे त्याच्यावर प्रश्नांची सरबत्ती करून  तक्रार दाखल न करताच परत पाठवले जाते. किंवा उशीरा तक्रार दाखल करण्यात येते. याला कंटाळून  चोरी झाली तरीही शेळ्या मेंढ्याचे मालक तक्रार दाखल करण्यासाठी पुढे येत नाहीत. तक्रार दाखल केली तरीही गुन्हेगार सापडत नाही. सखोल तपास होत नाही. यामुळे गुन्हेगार निडर होऊन ते आत्ता १०,२०,३०, शेळ्या मेंढ्यांच्या संपूर्ण कळपच चोरी करून वाहनातून घेऊन जात आहेत. आपण शेळ्या मेंढ्या चोरी प्रकरणात लक्ष घालून सर्व गुन्ह्यांच्या तपास करण्यात यावा.व आरोपींना शोधून कडक कार्यवाही करण्यात यावी. तसेच पोलीस ठाण्यात तक्रार घेण्यासाठी टाळाटाळ करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी. जेणेकरून  शेळ्या-मेंढ्या चोरण्याचे आरोपींचे धाडस होणार नाही.व चोरी झाली तर शेळ्या मेंढपाळांची तक्रार तातडीने दाखल करून घेतील. गरीब मेंढपाळ भटकंती करून मेंढ्याच्या जीवावरच आपला संसाराचा गाडा चालवतात व त्यांचे संपूर्ण संसार शेळ्या-मेंढ्यांच्या उत्पन्नावर चालतात तरी  आपणास विनंती सदर प्रकरणात आपण लक्ष घालून आम्हास न्याय मिळवून द्यावा अशी विनंती. अशा आशयाचे निवेदन संजय वाघमोडे यांच्या नेतृत्वाखालील संघटनेच्या शिष्टमंडळाच्या वतीने समक्ष भेटून देण्यात आले होते. या निवेदनाची दखल घेऊन कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनिल फुलारी  यांनी दखल घेऊन  याबाबत तात्काळ गुन्हे दाखल करून घेण्याबाबत कोल्हापूर, सांगली, सातारा,पुणे ग्रामीण, सोलापूर ग्रामीण, पोलीस अधिक्षक हद्दीतील सर्व पोलीस ठाण्यांना पत्राद्वारे कळविण्यात आले आहे. तसेच आदेशाची प्रत यशवंत क्रांती संघटना यांना देण्यात आली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या