🟪 सकाळच्या वेळी तरससदृश्य वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात ५ बकरी ठार, ११ गंभीर जखमी 🟨 खुपिरे ता. करवीर, येथील घटना 🟩 'यशवंत क्रांती' तात्काळ मदत

 

🟪 सकाळच्या वेळी तरससदृश्य वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात ५ बकरी ठार, ११ गंभीर जखमी

    🟨 खुपिरे  ता. करवीर, येथील घटना

🟩 'यशवंत क्रांती'  तात्काळ मदत

वृत्त एकसत्ता न्यूज

आकाश भाग्यवंत नायकुडे

मुंबई दिनांक 12/04/2025 : तरससदृश्य  वन्यप्राण्यांनी केलेल्या हल्ल्यात वाकरे  (ता.करवीर) येथे  केलेल्या हल्ल्यात अर्जुन हराळे व राजाराम अवघडी रा. खुपिरे  ता. करवीर या मेंढपाळाची ५ बकरी ठार तर ११ गंभीर जखमी झाली आहेत. हा हल्ला १२ एप्रिल रोजी सकाळी  ८.३० वाजण्याच्या दरम्यान झाला. या घटनेमुळे मेंढपाळाचे १५००००/- रू. आर्थिक  नुकसान झाले आहे.

       याबाबत माहिती अशी कि  अर्जुन बिरू हराळे व राजाराम अवघडे हराळे  मु.पो. खुपिरे ता. करवीर जि. कोल्हापूर  येथील कायमचे रहिवासी असून ते त्यांच्या २०० मेंढरांचा कळप शेत मालक  दिनकर महादेव पाटील रा. वाखरे (कुरणात गट नं. ११७५ ) यांच्या शेतात  खतासाठी बसायला ५ दिवसापासून आहे. 

       दिनांक १२ एप्रिल २०२४ रोजी शनिवार सकाळी ८.३० वाजण्याच्या दरम्यान मेंढरांच्या तळावर तरससदृश्य  वन्यप्राण्यांनी हल्ला केला. तोही मेंढपाळ यांच्या समोरच मेंढपाळांनी हुसकावून लावण्यासाठी प्रयत्न केले तरीही वन्यप्राणी कळपावर हल्ला करतच होते. ओरडण्याचा आवाज ऐकून शेतकरी व इतर मेंढपाळ मदतीला आल्यावर तरससदृश्य वन्यप्राणी पळून गेले. या हल्ल्यात अर्जुन हराळे यांची २ मेंढी ठार व ६ बकरी (कोकरे लहान मोठी)गंभीर जखमी, राजाराम हराळे यांची  मोठ्या शेळी २ व मेंढीचे कोकरू १ ठार व 

जखमी ५ मेंढ्या जखमी झालेल्या आहेत.  हल्ल्याची घटना मेंढपाळ अर्जुन हराळे व भिकाजी हराळे यांनी यशवंत क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संजय वाघमोडे, यांना कळवले. संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संजय वाघमोडे  यांनी हि घटना तात्काळ वनपाल शैलेश शेवडे व पशुसंवर्धन अधिकारी वैभव खराडे यांना कळविली. वनाधिकारी व पशुसंवर्धन अधिकारी जिल्हा संपर्क प्रमुख सुनील शेळके, जिल्हा संघटक सचिन लांडगे यांच्यासह घटना स्थळी उपस्थित राहून पंचनामा करण्याची विनंती केली.  

      वनरक्षक विदेश ताबारे, वन सेवक रवींद्र पवार, यांनी घटनास्थळी उपस्थित राहून घटना स्थळाचा पंचनामा केला यांनी पंचनामा केला. डाँ वैभव खराडे, पशुधन अधिकारी श्रेणी १, खुपिरे, रघुनाथ शेगावकर, यांनी मृत बकऱ्यांचे शवविच्छेदन केले. यावेळी खुपिरे शाखा पदाधिकारी मेंढपाळ उपस्थित होते.

      "शासनाचा कोणताही आदेश नसताना उपवनसंरक्षकांच्या तोंडी आदेशानुसार मृतप्राण्याच्या शव ट्रप कॅमेऱ्याच्या निगराणीत ठेवण्यात येत आहे शवविच्छेदन केल्यानंतर दुर्गदी सुटते, पुन्हा वन्य प्राणी पुन्हा येणाची शक्यता नसते. परंतु भटक्या कुत्रे खाण्यासाठी येतात जर भटकी कुत्री ट्रप कॅमेऱ्यात दिसले तर नुकसान भरपाई देण्यासाठी टाळाटाळ केली जाते हा अमानवीय आदेश तात्काळ रद्द करण्यात यावा".- संजय वाघमोडे संस्थापक अध्यक्ष यशवंत क्रांती संघटना

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या