🟪 तरस सदृश्य वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात १२ बकरी ठार ८ गंभीर ४ बेपत्ता
🟦 पुशिरे ता. पन्हाळा, येथील घटना
वृत्त एकसत्ता न्यूज
आकाश भाग्यवंत नायकुडे
मुंबई दिनांक 25/04/2025 : तरस सदृश्य वन्यप्राण्यांनी केलेल्या हल्ल्यात पुशिरे (ता.पन्हाळा) अनिल भिवा गावडे, व काशिनाथ ईश्वरा गावडे या मेंढपाळाची १२ बकरी ठार तर ८ गंभीर जखमी व ४ बेपत्ता आहेत. हा हल्ला बुधवारी संध्याकाळी ६.३० ते ७.३० वा. झाला. या घटनेमुळे मेंढपाळाचे दिड लाख रूपयापैक्षा जास्त आर्थिक नुकसान झाले आहे.
याबाबत माहिती अशी कि अनिल भिवा गावडे, व काशिनाथ ईश्वरा गावडे, रा आडुर ता. करवीर जि. कोल्हापूर, येथील कायमचे रहिवासी असून ते त्यांच्या मेंढरांचा तळ पुशिरे ता.पन्हाळा येथील शेतकरी तानाजी नारायण पाटील यांच्या (खडकाचा माळ गट नं 197) शेतामध्ये गेली सहा ते सात दिवसापासून खतासाठी बसायला आहेत.
बुधवार दि. २३ रोजी सायंकाळी सहा ते सात वाजण्याच्या दरम्यान वनप्राण्यांनी मेंढराच्या कळपावर हल्ला केला. हा हल्ला एवढा भयानक होता की मेंढपाळ घाबरून गेले व आरडा करू लागले व कशीबशी त्या प्राण्यांना हुसकु लागले. परंतु वन्यप्राणी नऊ ते दहा असल्या मुळे त्या हल्ल्यात सुमारे १३ मेंढ्यांची कोकरे मृत्यू व ८ जखमी झाल्या. व ४ बेपत्ता झाली आहेत. हल्ल्याची घटना मेंढपाळ काशिनाथ ईश्वरा गावडे, बिरदेव लांडगे,आडूर, यशवंत क्रांती संघटनेचे जिल्हा संघटक सचिन लांडगे यांनी यशवंत क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संजय वाघमोडे, यांना कळवताच त्यांनी हि घटना तात्काळ वनविभाग व पशुसंवर्धन अधिकारी यांना कळवून घटना स्थळी उपस्थित राहून पंचनामा करण्याची विनंती केली. तसेच यशवंत क्रांती संघटनेचे कांडगाव शाखेचे तानाजी लांडगे यांना घटना स्थळी उपस्थितीत राहुन मेंढपाळांना मदत करण्याबाबत सुचना केली.
वनरक्षक योगेश, त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी पंचनामा केला. डाँ रणजित वेदपाठक पशुवैद्यकीय अधिकारी कळे, यांनी मृत कोकरांचे शवविच्छेदन व जखमी वर उपचार केले यावेळी, तानाजी लांडगे, अनिल गावडे, काशिनाथ गावडे,शेतकरी तानाजी पाटील, अतुल धनगर, बिरदेव लांडगे,अनिल धनगर,अतुल धनगर, यशवंत क्रांती संघटनेचे पन्हाळा व करवीर तालुक्यातील पदाधिकारी मेंढपाळ घटनास्थळी स्थळी उपस्थित होते.
0 टिप्पण्या