🟣 मनाची शुद्धता 🟡
वृत्त एकसत्ता न्यूज
दिनांक 13/04/2025 :
आपल्या प्रत्येकामध्ये काही ना काही कमतरता असते, उणीव असते. परिपूर्ण आहे असे कोणीच नसते. फरक असतो कमी-जास्त प्रमाणाचे. ते भरून काढण्याचे काम आपण मनापासून केले की जीवन आनंदी बनते.
गरज आहे उणिवा ओळखणे व त्या भरून काढण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणे. शरीर कमकुवत असेल तर आहार, विहार, व्यायाम यावर लक्ष केंद्रित करून ते सुदृढ करण्याचा प्रयत्न करणे. बुद्धी कमी असेल तर ती वाढवण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणे. प्रयत्नातून यशापर्यंत पोहोचू शकतो.
आपल्यात भावनिक, मानसिक अशाही कमतरता असतात. ज्यांच्यामुळे आपल्यातील नकारात्मकता जाणवते व परस्परांमध्ये नातेसंबंध बिघडण्याची शक्यता असते. त्या कमतरतेवर मात करून आपण सकारात्मक विचार व वर्तन करू शकतो.
आजचा संकल्प
_आपल्यात कोणत्या प्रकारच्या त्रुटी आहेत त्या जाणून घेऊ. त्या दूर करण्याचा प्रयत्न करू. यशस्वी जीवन जगण्यासाठी सकारात्मक बदल करू._
- सौ. स्नेहलता स. जगताप


0 टिप्पण्या