महाराष्ट्राचे भूषण गवई होणार सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश
वृत्त एकसत्ता न्यूज
आकाश भाग्यवंत नायकुडे
मुंबई दिनांक 15/04/2025 :
गवई यांची सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदी 24 मे 2019 मध्ये नियुक्ती झाली होती. आता ते 14 मेला सरन्यायाधीश पदाची शपथ घेतील. तर 23 नोव्हेंबर 2025 ला निवृत्त होतील. त्यामुळे सरन्यायाधीश म्हणून त्यांना सहा महिन्याचा कार्यकाळ मिळेल.
सर्वोच्च न्यायालयाच्या वेबसाईटवर भूषण गवई यांच्या विषयी माहिती आहे त्यामध्ये म्हटले आहे की, ऑगस्ट 1992 ते जुलै 1993 या कालावधीत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात सहाय्यक सरकारी वकील आणि अतिरिक्त सरकारी अभियोक्ता म्हणून नियुक्ती होती. जानेवारी २००० मध्ये नागपूर खंडपीठासाठी त्यांची सरकारी वकील म्हणून नियुक्त करण्यात आली होती.
14 नोव्हेंबर 2003 रोजी मुंबई उच्च न्यायालयात अतिरिक्त न्यायाधीश म्हणून पदोन्नती. 12 नोव्हेंबर 2005 रोजी कायम न्यायाधीश म्हणून नियुक्ती.
भूषण गवई यांचा जन्म 24 नोव्हेंबर 1960 रोजी अमरावती येथे जन्म झाला. 1985 मध्ये त्यांनी वकिलीची सुरुवात केली. त्यांनी उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती दिवंगत बारिस्टर राजा एस. भोसले यांच्यासोबत काम केले.गवई यांनी मुंबई उच्च न्यायालयात वकीली केली नंतर ते नागपूरला आले. नागपूर महानगरपालिका, अमरावती महानगरपालिका आणि अमरावती विद्यापीठासाठी स्थायी वकील म्हणून काम पाहिले.
0 टिप्पण्या