सहकार महर्षि अभियंत्रिकी महाविद्यालया मध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी

 

सहकार महर्षि अभियंत्रिकी महाविद्यालया मध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची  जयंती साजरी

वृत्त एक सत्ता न्यूज 

आकाश भाग्यवंत नायकुडे 

मुंबई दिनांक 16/4/2025 :

 सहकार महर्षि शंकरराव मोहिते पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड रिसर्च, शंकरनगर-अकलूज या अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १३४ वी जयंती उत्सहात साजरी करण्यात आली.यावेळी महाविद्यालय समन्वयक पोपट भोसले–पाटील यांच्या हस्ते  डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर त्यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी आपले मनोगत व्यक्त केले व सर्वांना डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी महाविद्यालयाचे महाविद्यालय समन्वयक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.  या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तसेच आभार प्रदर्शन प्रा. संजय झंजे यांनी केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या