सहकार महर्षि कारखान्याचे सहवीज प्रकल्पास
"देशातील सर्वोत्कृष्ट सहवीज निर्मिती प्रकल्प" पुरस्कार प्रदान
वृत्त एकसत्ता न्यूज
आकाश भाग्यवंत नायकुडे
मुंबई दिनांक 21/04/2025 :
शंकरनगर - अकलूज (तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर महाराष्ट्र राज्य) येथील सहकार महर्षि शंकरराव मोहिते-पाटील सहकारी साखर कारखान्याच्या सहवीज निर्मिती प्रकल्पास को-जनरेशन असोसिएशन ऑफ इंडीया यांचे वतीने सन 2024 चा "देशातील सर्वोत्कृष्ट सहवीज निर्मिती प्रकल्प" पुरस्कार प्रदान करण्यात आला.
पुरस्कार वितरण सोहळा माजी केंद्रिय कृषी मंत्री व को-जनरेशन असोसिएशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष, मा.खा.शरदचंद्र पवार यांचे शुभहस्ते व सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, राष्ट्रीय सहकारी साखर संघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील, को-जन असोसिएशन चे उपाध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर, महासंचालक संजय खताळ, राज्य सहकारी संघाचे अध्यक्ष पी.आर. पाटील यांचे उपस्थितीत शनिवार दि.19/04/2025 रोजी संपन्न झाला.
सदर पुरस्कार स्विकारणेसाठी कारखान्याचे व्हाईस चेअरमन शंकरराव माने-देशमुख, कार्यकारी संचालक राजेंद्र चौगुले व को-जन मॅनेजर- युवराज निंबाळकर, चिफ् इंजिनिअर व फॅक्टरी मॅनेजर- सुर्यकांत गोडसे, डेप्युटी को-जन मॅनेजर-संतोष राजेभोसले व कार्यलक्षी संचालक- रणजीत रणनवरे उपस्थित होते.
कारखान्याचे मार्गदर्शक संचालक, महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांचे मार्गदर्शनाखाली व कारखान्याचे चेअरमन जयसिंह मोहिते-पाटील यांचे नेतृत्वाखाली कारखान्याची वाटचाल प्रगतीपथावर चालू आहे.
सहकार महर्षि कारखान्यास सन 2024 चा "देशातील सर्वोत्कृष्ट सहवीज निर्मिती प्रकल्प" पुरस्कार को-जनरेशन असोसिएशन ऑफ इंडीया कडून प्रदान करणेत आला असून कारखान्यास यापूर्वी राष्ट्रीय व राज्य पातळीवरील विविध पुरस्कार प्राप्त झाले असल्याची माहिती कारखान्याचे कार्यकारी संचालक राजेंद्र चौगुले यांनी दिली.
को-जनरेशन असोसिएशन ऑफ इंडीया यांचे वतीने सन 2024 चा "देशातील सर्वोत्कृष्ट सहवीज निर्मिती प्रकल्प" मिळाल्याने कारखान्याचे संचालक, कार्यक्षेत्रातील सभासद, ऊस उत्पादक शेतकरी, कारखान्याचे अधिकारी व कामगार तसेच हितचिंतक यांचेमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.
0 टिप्पण्या