"श्री शंकर" कारखाना कार्यस्थळी ए आय तंत्रज्ञान व ऊस उत्पादन वाढीचे आधुनिक तंत्रज्ञान कार्यशाळा संपन्न

"श्री शंकर" कारखाना कार्यस्थळी

ए आय तंत्रज्ञान व ऊस उत्पादन वाढीचे आधुनिक तंत्रज्ञान कार्यशाळा संपन्न  

वृत्त एकसत्ता न्यूज

आकाश भाग्यवंत नायकुडे

मुंबई दिनांक 22/04/2025 : श्री शंकर सहकारी साखर कारखाना लि .सदाशिवनगर या कारखान्याच्या वतीने  नामदार देवेंद्र फडणवीस , मुख्यमंत्री  महाराष्ट्र राज्य यांचे  १०० दिवसीय कृती आराखड्यानुसार ऊस विकास योजणे अंतर्गत ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी ए आय तंत्रज्ञान व ऊस उत्पादन वाढीचे आधुनिक तंत्रज्ञान कार्यशाळेचे उदघाटन कारखाना कार्यस्थळावर महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री  विजयसिंह मोहिते - पाटील यांचे शुभहस्ते संपन्न झाले. कारखान्याचे चेअरमन विधान परिषेदेचे आमदार  रणजितसिंह मोहिते - पाटील यांचे  मार्गदर्शनाखाली, कार्यक्रमाचे अध्यक्ष माढा मतदार संघाचे  खासदार  धैर्यशिल मोहिते - पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आणि आमदार  उत्तमराम जानकर  विधानसभा सदस्य माळशिरस, कारखान्याचे व्हॉइस  चेअरमन  मिलिंद कुलकर्णी, माळशिरस पंचायत समितीचे माजी उपसभापती  अर्जुनसिंह मोहिते - पाटील, विश्वतेजसिंह रणजितसिंह मोहिते - पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये ही कार्यशाळा संपन्न झाली.



शेतकऱ्यांना ऊस पिकावर मार्गदर्शन करण्यासाठी  संतोष कंरजे (विशेषज्ञ मुदाशास्त्र विभाग ,कुषी विज्ञान केंद्र,बारामती ) ऊस पिकासाठी कुत्रिम बुद्धीमत्तेचा ( ए आय तंत्रज्ञान) समाधान सुरवसे (शास्त्रज्ञ वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, मांजरी -पुणे ) ऊस उत्पादन वाढीचे आधुनिक तंत्रज्ञान यांनी एकरी ऊस उत्पादन वाढविणे साठी अनमोल  मार्गदर्शन केले पारंपारिक शेती पद्धतीत बदल करीत आधुनिक तंत्रज्ञानाशी सांगड घालणे त्यातून उत्पादन क्षमतेत लक्षणीय वाढ साधता येईल ए आय च्या मदतीने शेतकरी अधिक शास्त्रशुद्ध आणि निर्णयक्षम शेती करू शकतील तसेच कृत्रिम बुद्धिमत्ता ( ए आय ) तंत्रज्ञानाच्या साह्याने ऊस पिक जोमात पिकवता येते व त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा नफा मिळवता येतो तर साखर कारखान्याचे साखर उताऱ्यात (रिकव्हरी ) मध्ये मोठा फरक पडू शकतो असा विश्वास कृषी विज्ञान केंद्राचे विशेष तज्ञ डॉक्टर संतोष करंजे यांनी व्यक्त केला .

ठिबकद्वारे अन्नद्रव्य खत व पाणी देण्यासाठी शेतकऱ्यांना ए आय तंत्रज्ञान अतिशय महत्त्वाचे आहे ठिबक द्वारे योग्य वेळी योग्य प्रमाणात ऊसाला पाणी द्यावे लागते उसात पाण्याचा डोह निर्माण करणे चुकीचे आहे कारण १ ते १.५ फुटाखाली जाणारे पाणी व खते वाया जातात पाणी अन्नद्रव्य मुळ्यांना शोषून घेता येत नाही पर्यायाने जमिनीचा पोत बिघडते मीठ फुटते व जमीन नापीक बनते असे डॉक्टर समाधान सुरवसे यांनी मत व्यक्त केले 

याप्रसंगी त्यांनी शेतकऱ्यांना उपस्थित केलेल्या प्रश्नांचे निर्जन करण्यात आले.

तसेच कारखान्यास सर्वाधिक ऊस सिझन 2024 -25 मध्ये ज्यादा ऊस पुरवठा केलेल्या सभासदांचा सभासद विभागातून 

1 शहाजीराव मुधोजीराव देशमुख राहणार नातेपुते टनेज ३३२ .२१३ मे टन २.  चंद्रकांत नारायण शिंदे राहणार शिंदेवाडी टनेज ३२०.९६७ मे .टन ३. श्री विठ्ठल गलबु कोरटकर राहणार गुरसाळे टनेज २८५ .९३९ मे.टन व बिगर सभासद विभागातुन 1.श्री अनिल मारुती जोरवर राहणार विठ्ठलवाडी टनेज ६९४. १६६ मे.टन .2. श्रीमती प्रतिभा विकास डोके राहणार पुंदावडे टनेज ४८९ .७४२ मे टन 3.श्री गणेश विठ्ठल बेदरे राहणार ब्रह्मपुरी टनेज ४०५. ८५९ मे टन या शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात आला सदर परिसंवादास पंचायत समितीचे माजी सदस्य , सहकार महर्षि शंकरराव मोहिते पाटील कारखान्याचे संचालक  ,शिवामृत दूध उत्पादक संघाचे संचालक , कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक , श्री शंकर कारखान्याचे संचालक मंडळ , ऊस उत्पादक शेतकरी व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच कारखान्याचे कार्यकारी संचालक श्री स्वरूप देशमुख , मुख्य कार्यकारी अधिकारी  अभिजीत डुबल , जनरल मॅनेजर  रविराज जगताप व अधिकारी खाते प्रमुख  ,विभाग प्रमुख व कर्मचारी उपस्थित होते सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक व्हॉ चेअरमन  मिलिंद कुलकर्णी यांनी केले व संचालक सुरेश पाटील यांनी आभार मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या