🟩 अकलूज येथे स्त्रीरोग तज्ज्ञ संघटने मार्फत पुरुष वंध्यत्वावर परिषद व कार्यशाळा संपन्न
🟪 जेष्ठ स्त्री रोग तज्ज्ञ डॉ.सतिश दोशी "जीवन गौरव" पुरस्काराने सन्मानित
वृत्त एकसत्ता न्यूज
आकाश भाग्यवंत नायकुडे
मुंबई दिनांक 29/04/2025 : अकलूज येथील ॲपेक्स हाॅस्पिटलमध्ये अकलूज येथे स्त्री रोग तज्ज्ञ संघटनेच्या वतीने पुरुष वंध्यत्वावर परिषद व कार्यशाळा उत्साहात संपन्न झाली. या कार्यशाळेसाठी महाराष्ट्र राज्यातील नावाजलेले डॉक्टरर्स उपस्थित होते तसेच अकलूज, पंढरपुर, टेंभुर्णी, करमाळा, सांगोला येथील ६० हून अधिक स्त्री रोग तज्ञ व सर्जन्सनी सहभाग घेतला होता.
यावेळी परिषदेसाठी प्रमुख पाहुणे महाराष्ट्र राज्य स्त्री रोग तज्ञ संघटनेचे अध्यक्ष डॉ. किरण कुर्तकोटी,सह सचिव डॉ. निलेश बलकवडे, अकलूज स्त्रीरोग तज्ज्ञ संघटनेच्या अध्यक्षा डॉ.रेवती राणे, सचिव डॉ.कविता कांबळे, सिनियर स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ.सतिश दोशी आदींनी उपस्थित राहून मार्गदर्शन केले.
अकलूज स्त्रीरोग तज्ज्ञ संघटनेचे मागील वर्षीचे अध्यक्ष डॉ.भारत पवार, सचिव डॉ. मनीषा शिंदे, कोषाध्यक्ष डॉ. दत्तात्रय सर्जे यांनी कार्यभागाचा आढावा घेतला व पुढील सूत्रे नव नियुक्त अध्यक्षा डॉ.रेवती राणे, सचिव डॉ.कविता कांबळे , सहसचिव डॉ.अमित चोपडे, कोषाध्यक्ष डॉ.विशाल शेटे यांच्याकडे सुपूर्त केली. नूतन पदाधिकाऱ्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन होऊन कार्यशाळे चे उद्घाटन झाले.
या कार्यक्रमात अकलूजमधील सिनियर स्त्री रोग तज्ज्ञ डॉ.सतिश दोशी यांना जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
यावेळी डॉ.वंदना गांधी, पंढरपूर येथील डॉ.सुदेश दोशी, डॉ.सचिन पवार,सोलापूर येथील प्रसिद्ध स्त्री रोग तज्ञ डॉ.राजीव दबडे, मीनल चिडगुपकर इत्यादी मान्यवर उपस्थित होत़े.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.जागृती मगर,डॉ, मानसी देवडीकर यांनी केले.
0 टिप्पण्या