विचारधारा

 

विचारधारा 

वृत्त एकसत्ता न्यूज

संकलन: आकाश भाग्यवंत नायकुडे

मुंबई दिनांक 02/04/2025 : स्पर्धा म्हटले की जिंकणे व हरणे आलेच. एक गुण जरी जास्त मिळाला तरी प्रतिस्पर्धी जिंकतो. एका गुणाने आपण हरलो म्हणजे आपल्याला काही येत नाही असे नाही. आपण जिंकणाऱ्या प्रतिस्पर्ध्यांच्याच तोडीचे असतो. थोडे कमी पडलेले असतो.

कोणत्याही स्पर्धेत एकदा हरलो म्हणजे पुन्हा जिंकणार नाही असे नसते. पूर्वीच्या चुका टाळून, नवीन डावपेच आखून बाजू पलटवता येते. अभ्यास असो, खेळ असो अथवा इतर कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी आपला आत्मविश्वास फार महत्त्वाचा असतो.

मुलांनो, आयुष्यात हार-जीत होत असते. जिंकलो याचा आनंद असतो तसे हरल्यावर वाईट वाटते पण निराश न होता त्यातूनच बरेच शिकायला मिळते. जिद्द वाढते, आत्मविश्वास वाढतो आणि अनुभव मिळतो. हार पचवण्याची मानसिकता आपल्याला भविष्याला सामोरे जाण्यासाठी कणखर बनवते.

जयहिंद!🇮🇳

_- सौ. स्नेहलता स. जगताप._

संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे,मुंबई. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या