महाराष्ट्राचे कुलदैवत शंभु महादेव।

महाराष्ट्राचे कुलदैवत शंभु महादेव। 

वृत्त एकसत्ता न्यूज

संकलन: आकाश भाग्यवंत नायकुडे

मुंबई दिनांक 08/04/2025 : चैत्र एकादशीच्या दिवशी असते शंभु महादेव यात्रा, शिखर शिंगणापूर! पार्वतीने रुसून लपून बसलेल्या शंकराला अचूक हुडकून काढले आणि पुन्हा जाऊ नये म्हणून चक्क दुसर्‍यांदा जिथे लग्न केले ते हे ठिकाण. स्वयंभू महादेवाचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे. शंकर पार्वतीच्या विवाहाचे ठिकाण म्हणून शिखर शिंगणापूरला 'दक्षिण कैलास' असे म्हणतात. 

सातारा जिल्ह्यातल्या माण तालुक्यामध्ये दहिवडी गावापासून २० कि.मी. अंतरावर शिखर शिंगणापूर वसले आहे. इथे असलेल्या डोंगराला शंभू महादेवाचा डोंगर म्हणतात. या डोंगराच्या पायथ्याशी शिंगणापूर गाव आहे. हा डोंगर म्हणजे सह्याद्रीचाच एक फाटा असल्याने डोंगरावर दाट झाडी आहे. महादेवाचे मंदिर याच डोंगरावर आहे. मंदिरात जायला जवळपास ४०० पायर्‍या चढून जावे लागते. त्यापुढे आणखी थोडे चढून गेल्यावर खडकेश्वर मंदिर आहे. 

महादेवाचे हे मंदिर आणि शिंगणापूर गाव यादव कुळातील सिंधण राजाने वसवले आहे असे म्हणतात. मंदिराला दगडी तटबंदी आहे आणि या मंदिराच्या आवारात पाच मोठ्ठे मोठ्ठे नंदी आहेत. या मंदिराचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे मोठ्या घंटा आहेत. या घंटापैकी एक घंटा ब्रिटीशांकडून मंदिराला मिळाली आहे. मंदिराच्या गाभार्‍यामध्ये दोन शिवलिंग आहेत. त्यांनाच शिव पार्वतीचे प्रतिक मानतात. 

शिवाजी महाराजांच्या घराण्यामध्ये शिखर शिंगणापूरच्या महादेवाचे अतिशय महत्त्व होते. इथे असणारा तलाव शिवतीर्थ असे म्हणतात. शिवाजी महाराजांचे आजोबा मालोजी भोसले यांनी १६०० मध्ये बांधला. या मंदिराविषयी आणखीन एक की, जीजाबाईंना शिवनेरीवर सोडून चिंताक्रांत शहाजीराजे परतत असतांना या मंदिरात दर्शनासाठी आले होते. तेव्हा त्यांना दृष्टांत मिळून सारे काही ठीक होईल असे शंकरांनी सांगितले. या गोष्टीची आठवण म्हणून जरी पटक्याबरोबर भगवा झेंडाही लावण्याचे त्यांनी ठरवले. 

या मंदिराचे शिखर हा स्थापत्यकलेचा उत्कृष्ट नमुना आहे. शिखरावर अगदी नाजुक नक्षीकाम केले आहे. मंदिराच्या आवारात अनेक दिपमाळा आहेत. या मंदिराच्या पश्चिमेकडे अमृतेश्वराचे हेमाडपंथी मंदिर आहे. मंदिरात चार वेळा पुजा केली जाते. दरवर्षी चैत्र शु. अष्टमीला शंकर पार्वती विवाह सोहळा अगदी साग्रसंगीत साजरा केला जातो. पंचमीला हळदीचा कार्यक्रम असतो. या लग्नासाठी एक भले मोठे ५५० फुट लांब पागोटे विणले जाते. ज्या कुटूंबाला हे काम दिले जाते ते कुटूंब पूर्ण वर्षभर यासाठी मेहनत करते. विवाहाच्या दिवशी या पागोट्याचे एक टोक महादेवाच्या कळसाला तर दुसरे टोक अमृतेश्वराच्या देवळाच्या कळसाला बांधतात. 

या महादेवाला अभिषेक करण्यासाठी खालून कावडीत पाणी आणतात. या कावडींमध्ये सगळ्यात मोठी कावड असते ती भुत्या तेल्याची. या कावडीला दोन मोठे मोठे रांजण लावलेले असतात. ते वर घेऊन जाणे हे तसे कष्टाचे काम. आणि मग ज्याच्या अभिषेकासाठी हे पाणी न्यायचे त्यालाच मदतीला बोलवतात. आणि हाकही हक्काचे माणूस असावे तशी म्हणजे, हे म्हादया, धाव, मला सांभाळ अशी. असा सगळा द्रविडी प्राणायाम करत ही कावड वर नेली जाते आणि महादेवाचा अभिषेक होतो. 

छत्रपति शिवाजी महाराज , शंभूराजे आणि समस्त भोसले कुळाचे कुळदैवत

महाराष्ट्राचे आराध्यदैवत माणदेशातील शिवक्षेत्र श्री "शिखर शिंगणापूर" मंदिर !

शिखर शिंगणापूरची स्थापना सिंघणराजे यादव (१२१० - ४७) या राजाने केली

म्हणून यास काळानुरूप शिंगणापूर हे नाव पडले आहे.

इथल्या डोंगर माथ्यावर एखाद्या शिरपेचा प्रमाणे शोभणारे शंभू महादेवाचे मंदिर

हे माणदेशात सर्वात उंच ठिकाणी वसलेले तीर्थक्षेत्र आहे असे मानले जाते .

हे देवस्थान अवघ्या महाराष्ट्राचे कुलदैवत मानले जाते

तसेच शंभू महादेव हे छत्रपती शिवाजी महाराजांचे देखील कुलदैवत आहे.

साधारणतः २ एकर परिसरात वसलेल्या या सुंदर मंदिराजवळ पोचण्यास जवळपास शेकडो पायऱ्या चढून जावे लागते.

पायरी मार्गाने येत असताना मध्ये एक जिजाऊ वेशीतून पुढे येऊन सुबक आणि भक्कम शेंडगे दरवाजा ओलांडून

मंदिराच्या प्रवेश द्वाराजवळ पोहचता येते. मंदिराच्या आवारात प्रवेश करताच आपणास समोर नंदी

आणि डाव्या बाजूस नगारखाना पहावयास मिळतो. नंदीच्या दर्शनानंतर मंदिरामध्ये प्रवेश करताना

भगवान शंकरास शरण आलेल्या पार्वतीचे चांदीमध्ये कोरलेले शिल्प आणि त्यापुढे कासवाचे दर्शन घेऊन

मुख्य मंदिरात प्रवेश घेऊन भगवान शंकराच्या पिंडीचे दर्शन होते.

मंदिराच्या गाभाऱ्यात एक भगवान शंकर आणि दुसरे पार्वती आशी दोन लिंग आहेत यांची आहेत.

शिंगणापूरचे हे लिंग स्वयंभू लिंग मानले जाते.

महादेवाच्या या मंदिराचे बांधकाम हे हेमाडपंती पद्धतीचे आहे.

या मंदिरास एक मुख्य आणि तीन उप-प्रवेशद्वार असे एकूण ४ प्रवेशद्वारे आहेत.

मंदिराच्या आवारात दोन दीपमळा पाहण्यास मिळतात. मंदिराचे एकूण शिल्पकाम हे अतिशय सुंदर

आणि सुबक असून यातून प्राचीन काळातील उत्तम सुबक शिल्पकलेचा अनुभव घेता येतो.

इ. स. पूर्व बाराशे शतकातील या मंदिराचे सौंदर्य चिरकाल टिकविण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी

त्यांच्या कारकिर्दीत जीर्णोद्धार केला. मंदिराचे छत हे एकूण १८ दगडी खांबावरती स्थित आहे.

छताचा विस्तार बाहेरील खांबापासून 3 फूट बाहेर पर्यंत विस्तारित आहे

आणि त्यावर मंदिराचे शिखर स्थितः आहे शिखराच्या समोर सभामंडपाच्या वरती दोन्ही बाजूस

हत्तीचे शिल्प पहावयास मिळते.मंडपामध्ये ३ तांब्या पितळे सजवलेले नंदी आहेत.

मंदिराच्या शिखरावर आणि खांबांवर अनेक देवी देवतांची कोरलेली शिल्पे तसेच

अनेक प्रसंग पहावयास मिळतात. मंदिराच्या आवारात बरीच लहान मंदीरे आहेत

तसेच इथे एक जुनी पंचधातूची मोठी घंटा देखील पहावयास मिळते.

बळी महादेव

मंदिराच्या दक्षीण दरवाज्यातून अमृतेश्वर मंदिराकडे जाता येते , यास "बळी महादेव" म्हणून देखील ओळखले जाते.

या मंदिराकडे पोचण्यासाठी रस्त्याची व्यवस्था देखील आहे, या मंदिराची रचना महादेवाच्या मंदिराप्रमाणेच आहे.

मंदिराचे प्रेवेश द्वार २५ फूट उंचीचे आहे.हे मंदिर चौरसाकार असलेले हे मंदिर गाभाराआणि सभा मंडप असे विभागले आहे.

मंदिराच्या पूर्व, पश्चिम आणि दक्षिणेस चौकोनी चबुतरे असून उत्तरेकडून मंडपाकडे जाण्यास मार्गिका आहे.

मंडपाचे छत हे १६ कोरीव दगडी खांबांवर स्थित आहे. रुंद प्रेवशद्वारातून या मंदिराच्या गाभाऱ्यात प्रेवेश करता येतो.

मंदिराचा गाभारा चांदणीच्या आकाराचा आहे. मुख्य (महादेवाच्या) मंदिराच्या पश्चिमेकडील दरवाज्यातून

थोड्या अंतरावर एका टेकडीवर छत्रपती शिवाजी महाराज, शहाजी महाराज आणि संभाजी महाराज

यांच्या स्मृती स्मारकांचे दर्शन होते.

छत्रपती संभाजी महाराजांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांचे पुत्र शाहू महाराज यांनी या स्मारकाचे बांधकाम केले.

यामध्ये अनुक्रमे पश्चिमेकडे छत्रपती शिवाजी महाराज, मध्ये शहाजी महाराज आणि पूर्वेला संभाजी महाराज अशी स्थित आहेत.

मंदिराच्या आवारातून दूरवर एक तलाव दिसतो त्यास पुष्कराज तलाव महणून ओळखले जाते

याचे बांधकाम अथवा जीर्णोद्धार शिवाजी राजांचे आजोबा मालोजी राजे यांनी कलेले आहे.

यात्रा :

१२ दिवस चालणाऱ्या शिखर शिंगणापूरच्या यात्रेची सुरवात चैत्र शुद्ध प्रतिपदेला म्हणजेच गुडी पाढव्याला होते.

पंचमीला पार्वती शंकराला हळद लागते व अष्टमीला रात्री १२ वाजता देवाची लग्न लागते.

हि यात्रा महादेवाच्या डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या उमाबनात भरते.

कावड हे या यात्रेचा महत्वपूर्ण भाग मानला जातो.

देवाला अभिषेक घालण्यासाठी विविध ठिकाणाहून पाणी घेऊन कावडी येतात.

या पैकी मनाची कावड ही सासवड इथल्या "भुतोजी तेली" ( तेल्या भूत्याची कावड म्हणून प्रसिद्ध आहे ) यांची असते.

द्वादशीला शिखर शिंगणापूरच्या पायथ्याला पोचून दुपारी ही कावड आतिशय अवघड मुंगी घाटातून डोंगरावर चढवली जाते.

हा सोहळा हा अतिशय वोलोभनीय आणि रोमांचक आसतो यामध्ये वाद्यांच्या तालावर भक्तमंडळी तल्लीन होऊन नाचतात

तसेच खांद्यावरून नेल्या जाणऱ्या कावडींची नयनरम्य अशी रस्सिखाच देखील खेळली जाते.

द्वादशीच्या मध्यरात्री कावडीच्या पाण्याने देवांस अभिषेक घातला जातो.

गुप्तलिंग :

शिखर शिंगणापूर पासून जवळच असलेले हे देवस्थान. भगवान शंकर तपश्चर्येला बसले असता

माता पार्वतीने भिल्लीनीचे रूप घेऊन तपश्चर्या भंग केली तेव्हा महादेव क्रोधीत होऊन

त्यांनी आपली जटा दगडावर आपटली आणि तिथून पाण्याचा प्रवाह प्रकट झाला

हा गोमुखातून पडणारा प्रवाह आजही पाहण्यासा मिळतो. पार्वतीने माफी मागून शंकरास शांती केले

आणि पुढे चैत्र शुद्ध अष्टमी शिखर शिंगणापूर येथे त्यांचा विवाह झाला.

या मंदिराजवळ पायऱ्या उतरून जावे लागते. या ठिकाणाचे दर्शन केल्या नंतरच

शिखर शिंगणापूरची यात्रा पूर्ण झाली असे मानले जाते.

अशा या ठिकाणास भेट देऊन या ठिकाणाचे सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वैभव नक्कीच जाणून घ्या.

असं हे शिखर शिंगणापूर ऐतिहासिक, पौराणिक कथांशी जोडलेले एक रम्य ठिकाण आणि तीर्थक्षेत्रही!महाराष्ट्राचे कुलदैवत शंभु महादेव। 

अकलूज वैभव न्यूज नेटवर्क 

असं हे शिखर शिंगणापूर ऐतिहासिक, पौराणिक कथांशी जोडलेले एक रम्य ठिकाण आणि तीर्थक्षेत्रही!

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या