"बाप तो विठ्ठल आई ती रुक्मिणी सर्व तीर्थे त्यांच्या चरणी" - ह भ प बापू महाराज टेंगले
वृत्त एकसत्ता न्यूज
आकाश भाग्यवंत नायकुडे
मुंबई दिनांक 13/04/2025 : मुलांनी कोणत्याही तीर्थाच्या ठिकाणी गेलेच पाहिजे असे नाही. आई वडिलांची सेवा हीच ईश्वर सेवा होय."बाप तो विठ्ठल आई ती रुक्मिणी सर्व तीर्थे त्यांच्या चरणी" असे मौलिक विचार स्वरभूषण ह भ प बापू महाराज टेंगले राहू यांनी फुलांचे कीर्तन सेवेतील पुष्पगुंपताना व्यक्त केले. बंडगरवस्ती, पिठेवाडी, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे येथील कै. कृष्णराव बापूराव बंडगर (गुरुजी) यांचे प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त (प्रथम वर्षश्राद्ध) रविवार दिनांक 13 रोजी आयोजित केलेल्या फुलांचे कीर्तन सेवा बजावताना ते बोलत होते.
कीर्तनसेवे नंतर फुलांची उधळण होऊन आरती नंतर महाप्रसादाच्या पंगती उठल्या. विजयानंद (पप्पा) कृष्णराव बंडगर, जयानंद कृष्णराव बंडगर, अमर कृष्णराव बंडगर आणि बंडगर परिवाराच्या वतीने गुरुजींच्या प्रथम वर्षश्राद्ध निमित्त योग्य असे नियोजन केलेले होते.


0 टिप्पण्या