मनाची शुद्धता
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलन: आकाश भाग्यवंत नायकुडे
मुंबई दिनांक 07/04/2025 : आपण इतरांसाठी ज्या छोट्या छोट्या गोष्टी करतो त्या आपल्याला जरी किरकोळ वाटतात. त्यामध्ये कोणताच अहंभाव नसतो. या हाताचे त्या हाताला कळू नये याची काळजी घेतात. अर्थात त्या व्यक्तीसाठी वेळेला झालेली ती मदत फार मोठी असते.
मात्र काही वेळेस उलट अनुभव येतो. एखादा मदत करतो छोटीशी पण आव आणतो कुबेराचा. त्याचा गवगवा करणे, जाहिरातबाजी करणे, मुलाखत देणे, स्वत:च स्वतःला मोठेपणा घेणे असा प्रकार होतो. ज्याने मदत घेतली त्याला कुठून मदत स्वीकारली असा पश्चाताप होतो.
खरे तर वेळप्रसंगी एकमेकांना मदत करणे ही एकप्रकारची माणुसकीची देवाण घेवाण असते. प्रत्येकावर वेळ येऊ शकते. ती सांगून येत नाही. अशा काही घटना घडतात की क्षणात चित्र बदलते. शिखरावर असलेला कधी खाली येतो ते त्याला सुद्धा समजत नाही. त्यामुळे प्रत्येकाने जमिनीवर असणे महत्वाचे आहे.
आजचा संकल्प
_माणूस आहोत, माणसांना मदत करणे ही माणुसकी जपू व एकमेकांना मानसिक आधार देण्यासाठी सदैव तत्पर राहू._
_- सौ. स्नेहलता स. जगताप._
0 टिप्पण्या