आ. रणजितसिंह मोहिते-पाटील व खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित रोजगार मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद

 

आ. रणजितसिंह मोहिते-पाटील व खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित रोजगार मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद

वृत्त एक सत्ता न्यूज 

संकलन : आकाश भाग्यवंत नायकुडे 

मुंबई दिनांक 16/4/2025 : आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील व खासदार धैर्यशिल मोहिते-पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त शिवरत्न शिक्षण संस्था व श्री शिवपार्वती सार्वजनिक विकास ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने शिवरत्न नॉलेज सिटी, अकलूज येथे टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) यांच्या सहकार्याने  रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या मेळाव्याला माढा लोकसभा मतदारसंघातील विविध गावांमधून आलेल्या ५१३ युवक-युवतींनी सहभाग नोंदवला.

या रोजगार मेळाव्याचे उद्घाटन शिवपार्वती सार्वजनिक विकास ट्रस्टचे विश्वतेजसिंह मोहिते-पाटील व सयाजीराजे मोहिते-पाटील, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसचे राहुल गीरी यांचे शुभहस्ते करण्यात आले. 

प्रमुख पाहुणे विश्वतेजसिंह मोहिते पाटील व सयाजीराजे मोहिते पाटील यांनी आपल्या मनोगतात अशा प्रकारच्या रोजगार संधी उपलब्ध करून देण काळाची गरज असल्याचे प्रतिपादन केले. 

  टीसीएस चे राहुल गीरी यावेळी उपस्थित उमेदवारांना TCS मध्ये उपलब्ध रोजगार संधी, आवश्यक कौशल्ये, मुलाखतीची तयारी आणि IT क्षेत्रातील करिअर विषयक मार्गदर्शन केले.



खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांनीही campus ड्राईव्हला भेट देवून व उपस्थितांना शुभेच्छा दिल्या. 

उद्घाटन कार्यक्रमास TCS प्रतिनिधी आकांशा मोझर व मयुर जाजुरी, शिवदास शिंदे, शिवरत्न शिक्षण संस्थेचे सचिव धर्मराज दगडे, संचालक डॅा विश्वनाथ आवड, दत्तात्रय लिके, श्रीकांत राऊत, प्रा. सुभाष शिंदे, प्रा. भारत साठे, अमित पुंज आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

"आ. रणजितसिंह मोहिते-पाटील व खासदार धैर्यशील मोहिते-पाटील वाढदिवसानिमित्त आयोजित करून दोन्ही शिक्षण संस्थानी सामाजिक जाणिवेचे उदाहरण दाखवून दिले आहे. तरुण पिढीला योग्य दिशा मिळवून देण्यासाठी अशा उपक्रमांची नितांत गरज आहे."असे उपस्थित मान्यवरांनी नमूद केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या