काळभैरव
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलन: आकाश भाग्यवंत नायकुडे
मुंबई दिनांक 08/04/2025 : श्री काळभैरव हे अकरा भैरवांचे अधिपती. श्री काळभैरवाच्या अधीन काळ आणि वेळ आहे . काळवेळेच्या अधीन नियती आहे . ही सर्व सदगुरुंच्या अधीनख आहेत . आणि श्री काळभैरव सदगुरुंचा दास आहे . जगन्नियंत्या भगवान शिवाची ती प्रलयंकारी उजवी बाजु . त्यांचे महात्म्य धर्ममार्तंडानी लपवून ठेवलय . हा देव ज्याची वज्रदाढ दंत नीलवर्णीय आहे . ज्याची काया सर्वात मोठी आहे . जो प्रत्येक युगाचा अंत करणारा आहे . असा हा शामवर्ण भैरव ज्यास प्रत्येक कार्यात स्मरण करुन कार्यारंभ करतात .
काळभैरव साधनेमुळे प्रकृतीगर्भात मानवाला ग्रासणारे पितृदोष , नजरदोष ,ग्रहबाधा ,शत्रूबाधा ,भुत प्रेत पिशाच्चबाधा ,करणी ,भानामती , तसेच ईंद्र, कलि ,माया निर्मित संकट मालिकांपासुन मुक्तता मिळते .मायेची तोड फक्त श्री काळभैरवच आहेत . तो रुद्रच असल्याने आदिपुरूष म्हणता येईल . त्याची कठोर साधना साधकाला सर्व दैत्य,पिशाच्च शक्तींवर एक हुकुमी सत्ता मिळवुन देते .पण दासाचीही पात्रता तशीच असावी लागते . हे दैवत विधिलिखितही अडवतं . श्री काळभैरव शैतानी शक्तीना नाचविणारे एकमेव ज्वलंत दैवत आहे . हे विवेकशील सय्यमी आणि पारदर्शी चारित्र्य ही प्राथमिक पात्रता . तिथे व्याभीचार लबाडी आणि खोटेपणास थारा नाही . अशा लोकांसाठी श्री काळभैरव उग्र दैवत आहे .मृत्युपेक्षाही भयानक आहेत . उलट सदगुरुदासांसाठी ते प्रेमळ आणि भक्तवत्सल आहेत .ते घरातील वास्तुपुरुषापासुन ते कुलदेवतेच्या दैत्यमुखापर्यंत कोणालाही कुठेही आणि कसेही क्षणात संपवु शकतात . गोस्वामी तुलसीदास यानी देखील भैरवयातना भोगल्या आहेत . त्यांच्या निर्व्याज साधनेने गमावलेला आत्मविश्वास पुन्हा प्राप्त होतो . मनात भय रहात नाही . आंतरिक विचारात बळ येते . जीवनाचा दृष्टीकोण विशाल होतो . शैतानी शक्तीपासुन आत्मरक्षा होते . अंतर्बाह्य शत्रूच्या पकडीतुन मनुष्य दुर जातो .आध्यात्मिक जीवनात रुची निर्माण होते . कठिण कार्य सहज पूर्ण होतात . आपल्या जीवनावर आपले वर्चस्व निर्माण होते . काली मातेची साधना योग साध्य होतो . सदगुरु हे कामधेनु आहेत . श्री काळभैरव तत्व सदगुरु अधीन असल्याने सदगुरु प्रणित सूक्ष्म हस्तपादुका माळेने दश भैरवांची जप साधना केल्यास सर्व लक्ष्मींची प्राप्ती होते . पण श्री काळभैरवांच्या लेखी चुकीला माफी नाही .
श्री काळभैरव यांनी मृत्यु , देवराज ईंद्र , ब्रम्हदेव , नृसिंहदेव आणि भगवान विष्णु यांचा गर्वहरण केले होते . लोकानाच काय तर साधु योगिजनाना देखील त्यांचा अभ्यास होवु शकला नाही . श्री काळभैरव हे मोक्षप्राप्तीसाठीचे श्री दत्त अधिष्ठान हृदयात तयार करतात .श्री काळभैरव स्वाधिष्ठानाला वळसा घालुन सदगुरुंकडे आणि त्यायोगे दत्त महाराजांकडे जाण्याचा मार्ग नाही . हा मार्ग अत्यंत कठीण . जिगर असेल तरच मार्गक्रमण शक्य आहे . शनी हा काळभैरव देवांचा सर्वात मोठा भक्त आहे . श्री काळभैरव देवांची रामदास स्वामी यानी आरती लिहिलेली आहे . पण आता ती शोधुनही सापडत नाही .
श्री काळभैरव जितका सिद्ध योग्यांचा तितकाच महाचांडाळांचाही आहे . म्हणुनच प्रामाणिक आणि पारदर्शी रहावे . श्री काळभैरव दैवत सुक्षम देहातील वासनेची कर्म नष्ट करतात . काळभैरवाना क्षेत्रपाल असेही म्हणतात . क्षेत्र म्हणजे शरीर . पाल म्हणजे पालन करणारा . तो कर्म आणि अकर्माच्या गोंधळातुनही सोडवितो . ॐ काळभैरवाय नम; हा देवाचा जपमंत्र आहे . जपासाठी रुद्राक्षमाळा वापरतात . स्फटिक माळही चालते . महिला देखील हा जप करु शकतात . प्रामाणिक असल्यावर देवापुढे स्त्री पुरुष हा भेद रहात नाही .भैरवप्रहर हा रात्री १२ ते पहाटे ३ असा आहे . ह्या प्रहरात भैरवसाधना केल्यास अधिक प्रभावी आणि परिणामकारक ठरते . तप, जप आणि ध्यान मार्गात अग्रेसर होत असताना प्रथमदर्शनी बाह्य आवरणात्मक शुद्र शक्ती विविध रुपं आणि स्वरुपाद्वारे साधकाला भटकाव उत्पन्न करतात . हे अतिशय भयानक मायाजाळ आहे . त्यातुन सहज योग्य मार्ग तदृप शक्ती कधीही सापडु देत नाही . याला आंतरिक चकवा असे म्हणतात . ह्या चकव्यापासुन साधकाला काळभैरव दुर ठेवतात . काळभैरवाची सेवा केल्यास मृत्युनंतर पिशाच्च योनी कशी मिळेल? . त्यांची सेवा हा मृत्युवर विजयप्राप्तीची सुवर्णसंधी आहे . पंचमहाभुतांपलिकडे शिवतत्व आहे . साधकाला श्री काळभैरवनाथ श्री दत्तकृपेने तिथे घेउन जातात . श्री काळभैरवाची सेवा केल्यास शिवाची साधना आवश्यकता नाही . ती आपोआप साध्य होते . श्री काळभैरव यांचे प्राचीन मंदीरात गेल्यावर देवाच्या मुर्तीकडे एकटक पहावे . सात्विकता डोळ्यात भरुन येईल . भैरवोत्थान केवळ पद्मासनातच साध्य होते . मोरगाव येथील गणेश मंदीराच्या अकरा पाय- या अकरा भैरवाच्या प्रतीक आहेत .
१ प्रमुख - श्री काळभैरव
२ उपप्रमुख - बटुकभैरव
३ समायोजक - स्वर्णाकर्षण भैरव
४ अष्टभैरव - स्मशानभैरव
५ नग्नभैरव
६ मार्तण्डभैरव
७ कपालभैरव
८ चंडभैरव
९ सन्हारभैरव
१० क्रोधभैरव
११ रुरुभैरव
श्री काळभैरव पाताळवासी आहेत . त्याना दक्षिणेश्वर असेही म्हणतात . नक्षत्रे त्यांच्या आज्ञेची प्रकर्षाने वाट पहातात . त्याना प्रसन्न केल्यास नक्षत्रांचे फळ तुमच्या खिशात . श्री काळभैरवाच्या आज्ञेशिवाय कोणत्याही सूक्ष्मक्षेत्रात प्रवेश नाही . नकारात्मक उर्जा डोक्यात आणि शरीरास जाणवत असेल तर सलग सहा महिने श्री काळभैरव साधना करावी . त्याची साधना निर्गुणात सरस बनविते . आध्यात्मिक प्रगतीसाठी सगुणातुन निर्गुणात अनासक्तीने पदार्पण आवश्यक आहे . श्री काळभैरवांचा विनाअट ध्यास घेता आला पाहिजे . त्यांचा ध्यास लावाल तर कर्तव्यनिष्ठा देखील ठेवावी लागेल . धरसोडवृत्ती ठेवल्यास ते भाव देणार नाहीत . त्यावर जावुन जबरदस्ती विनवणी कराल तर उरली सुरली सुखशांती गमावुन बसाल . ईथे कधीही मानस स्तरीय मजामस्ती आणि ईतर अवहेलना करु नये . नेहमी जमेल तितके दत्तसाच्यात बसण्याचा प्रयत्न करावा . श्री काळभैरवांची अनुभूती येणे ही आत्ममार्ग निर्धोक सुरु असल्याची पुष्टी करते . श्री काळभैरवाच्या कक्षेत आल्याशिवाय नशिबाचे चक्र फिरत नाही . ईतर देव देवी बघ्याची भुमिका घेतात . पण भैरवनाथ प्रामाणिक आणि तळमळीला धावुन येतात . मन हृदय आणि नियती स्वच्छ हवी . सदगुरुभक्ती सुख दु:खाच्या पलीकडे गेल्यास दैव सदभक्ताला जीवनाच्या आपदास्थितीत पाठीशी घालतं . आध्यात्मिक जीवनात घोर साधना सात्विक वैराग्यपुर्ण व सदगुरु अधिष्ठानयुक्त असतात . ह्या साधना सहज समाधी ह्या अंतिम ध्येय योगापर्यंत घेवुन जातात .
किर्तनकार, प्रवचनकार ह.भ.प.
सौ.सोनालीताई महाराज मोरे-कापसे
मो.7038920920
0 टिप्पण्या