मनाची शुद्धता

 

मनाची शुद्धता

वृत्त एकसत्ता न्यूज

संकलन: आकाश भाग्यवंत नायकुडे

मुंबई दिनांक 04/04/2025 :

श्रीमंत व्हायला प्रत्येकालाच आवडते.  त्यासाठी अनेकजण कष्ट करतात. प्रामाणिकपणे संपत्ती वाढवतात तर अनेकजण लांडीलबाडी करून, इतरांना फसवून, भ्रष्टाचार करून माया कमवतात. कोट्यधीश, अब्जाधीश अन् त्याही पेक्षा पुढे जातात.

मात्र आपण सर्वसामान्य लोक कष्टाचे फळ मिळेल त्यात समाधान मानतो. मिळकतीचे व्यवस्थित नियोजन करतो. उधळ-माधळ न  करता बचत, काटकसर करतो. त्यामधून जे वाचवतो ती एक प्रकारची कमाईच असते. अशा ठिकाणी लक्ष्मी नांदते.

श्रीमंती मनाची असावी. त्यामधून जे समाधान मिळते त्यामध्ये सर्व कुटुंबीय आनंदी होते. आहे त्यात समाधान मानून  लबाडी व लोभीपणा जे दूर ठेवतात. कष्टाने कमावलेले खातात. आहे त्यातलेच भुकेल्याना घासातील घास देतात ते खरे श्रीमंत.

आजचा संकल्प

_पैशाने, धनाने श्रीमंत होऊन समाजात गर्वाने उन्मत्तपणे वागण्यापेक्षा मनाची श्रीमंती जास्त महत्त्वाची हे लक्षात ठेवू व सर्वांच्या बरोबर आनंदात राहून मनाची श्रीमंती जपू._

सौ. स्नेहलता स. जगताप

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या