🟣 "लेखकाचे कान आणि डोळे नेहमी उघडे असले पाहिजेत" - जयसिंह मोहिते पाटील.
वृत्त एकसत्ता न्यूज
आकाश भाग्यवंत नायकुडे
मुंबई दिनांक 18/04/2025 :
"समाजातील सर्वसामान्य लोकांना वाचण्याची आवड लावण्याची जबाबदारी लेखकाची आहे म्हणून लेखकाने आपले कान आणि डोळे नेहमी उघडे ठेवले पाहिजेत". असे मत सहकार महर्षि शंकरराव मोहिते पाटील सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन जयसिंह शंकरराव मोहिते पाटील यांनी वाफेगाव येथे व्यक्त केले. वाफेगांव (ता.माळशिरस,जि. सोलापूर) येथील लेखक संभाजी दिगंबर सरवदे यांनी लिहिलेल्या "वावटळ " या कादंबरीचे प्रकाशन जयसिंह मोहिते पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले तेव्हा ते बोलत होते.
पूर्वीच्या लोकांना वाचण्याची आवड होती.आता लेखकांनी आपल्या ज्ञानाचा उपयोग विद्यार्थ्यांसाठी केला पाहिजे असे सांगत जयसिंह मोहिते पाटील यांनी वि.स.खांडेकर, द. मा.मिराजदार, बाबासाहेब पुरंदरे अशा जुन्या काळातील नावाजलेल्या लेखकांचा उल्लेख करून वाफेगांव सारख्या ग्रामीण भागातील वावटळ कादंबरीचे लेखक संभाजी दिंगबर सरवदे यांचे कौतुक केले व त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
या प्रसंगी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून प्रताप क्रीडा मंडळाच्या अध्यक्षा कु.स्वरूपाराणी मोहिते पाटील, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ सोलापूरचे सहाय्यक कुलसचिव व कवी डॉ.शिवाजी शिंदे उपस्थित होते. प्रकाशन सोहळ्यासाठी लेखक डॉ.ज्ञानेश्वर जाधवर, काॅटनकिंग कंपनीचे व्हाईस प्रेसिडेंट खंडू गायकवाड, शिवकालीन इतिहासाचे व्याख्याते अशोक गायकवाड, सुमित्रा पतसंस्थेचे चेअरमन महादेवराव अंधारे, शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक नारायण भाऊ फुले, लेखक अशोक नजान,समिक्षा पब्लिकेशन पंढरपूरचे प्रविण भाकरे, ॲड.आकाश लोंढे, विनायक पराडे पाटील, प्रा.रामचंद्र सावंत, बलभीम गायकवाड, विठ्ठल गायकवाड, कुंडलिक गायकवाड, शिवराज शिंदे पाटील, शिवाजी गायकवाड, महेन्द्र खिलारे, महावीर हेंबाडे, अजय मदने, लखन शेंडगे, योगेश गायकवाड, नागनाथ सरवदे, दत्तात्रय हेंबाडे, दत्तात्रय चव्हाण,
अमोल शिंदे, सरपंच सौ.विजया एकनाथ शिंदे, सौ.मंदाकिनी प्रकाश लोंढे, अरूण शिंदे आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उमाजी माने यांनी केले तर आभार संगमेश्वर शिंदे यांनी मानले.


0 टिप्पण्या