महाराष्ट्रातील पत्रकारिता........✍️

 महाराष्ट्रातील पत्रकारिता........✍️

वृत्त एकसत्ता न्यूज

मुंबई दिनांक 03/04/2025 : तुषार खरात अनेक दिवस पोलिस कोठडी तुरुंगात असणे अत्यंत दुर्दैवी आहे. हा महाराष्ट्रातील पत्रकारिता, पत्रकार अन् संघटनांचा पराभव आहे. फडणवीसांना त्यांना फाट्यावर मारून लायकी अन् औकात दाखवून दिली आहे. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भूमिका आणि जयकुमार गोरेप्रती उतू जाणारे प्रेम पाहता एकूणच सर्व अवघड दिसतेय आता. काही कैद्यांना जामीन मिळाला नाही अन् तोवर चार्जशीट दाखल झाले तर सुनावणी पूर्ण होऊन निकाल लागेपर्यंत अंडर ट्रायल तुरुंगातच राहावे लागते बहुधा. 

अंग चोरणाऱ्या संघटना अन् तथाकथित पत्रकार नेते यांनी लक्षात घ्यावे की, आज तुषारवर वेळ आहे. उद्या कुणावरही येऊ शकते. राजकारणी मस्तवाल अन् शिरजोर होताहेत, हे ध्यानात घ्यायला हवे. तुषारची पत्रकारितेची स्टाईल, अहंभाव, अढ्यताखोरपणा याबाबत आक्षेप नक्कीच अनेकांचे आहेत; पण तूर्तास हे सर्व बाजूला ठेवून एका पत्रकाराची केली जाणारी कोंडी पाहायला हवी. स्वभावविशेष कुणाचे नाहीयेत वेगवेगळे. माझ्याबाबत तर असे झाल्यावर अनेक जण पेढे वाटतील, चेकाळून जय परशुराम नारे देतील. व्यक्ती मरू द्या हो, त्याच्या पत्रकार म्हणून भूमिकेला पाठिंबा द्या. तुषारची मोठी चूक ही आहे की, साताऱ्याहून अटकेची खबर फुटल्यावर दोन दिवस आधीच मी त्याला मोबाईल व सर्व इलेक्ट्रॉनिक साधने मुंबईत ठेवून सातपुड्यात, मध्य प्रदेश सीमेवर एका दुर्गम आदिवासी गावात आश्रयाला जाण्यास सांगितले होते. सर्व व्यवस्था केली होती. कोंकण-गोवा, बंगाल, पंजाब असे 2-4 पर्याय दिले होते. पण भाऊ अति आत्मविश्वासात राहिले. तो ज्या काही लोकांवर विसंबून राहिला, त्यांनी त्याला गाफील ठेवून घात केला. बाहेर दडला असता तर अटक टाळून, लांबवून अटकपूर्व जामिनासाठी प्रयत्न करता आले असते. दुर्दैव त्याचे! जयकुमार गोरे हे काही धुतल्या तांदळागत स्वच्छ नाहीत. तुषारला वापरले गेले. त्याच्या ते लक्षातच आले नाही. स्वभाव नडलाच. हे सारे काहीही असले तरी एखाद्या पत्रकाराला वाऱ्यावर सोडणे, आजिबात योग्य नाही. पत्रकार संघटनांनी यावर विचार करायला हवा. तुषार हा धनगर आहे म्हणून मराठ्यांनी त्याची साथ सोडावी, ब्राह्मणांनी कन्नी काटावी, माळ्यांनी गंमत पहावी, आंबेडकरवाद्यांनी तटस्थ राहावे... हे पत्रकारितेतील जातींचे कंपार्टमेंटायझेशन विषण्ण करणारे आहे. मुंबईतील शीर्ष पत्रकार संस्था मूग गिळून गप्प राहिल्या. त्याच्यावर गुन्हे आहेत, तर मग इथे साव कोण आहे? इथे एखादा दांडेकर पत्रकार असता तर? दुर्दैव हे की, हरामखोर कोरटकरसाठी प्रेम उतू जाणाऱ्या काही नीच प्रवृत्ती आजही पत्रकारितेत मिरवत आहेत. तुषारबाबत मात्र या प्रवृत्ती शेपूट घालून नानापुढे लोटांगण घालतात. असले भिकारचोट पत्रकार काय लायकीचे? तुषार त्याच्याहून कितीतरी उजवा आहे - पत्रकारितेच्या बाबतीत! शैली अन् स्वभाव द्या सोडून!! बेट्यांनो, आज सुपात आहात, उद्या कोण जात्यात जाईल सांगता यायचे नाही. 


विक्रांत

8007006862 WA 

Vikrant@Journalist.Com

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या