पांगरी येथे श्रीराम नवमी निमित्त अखंड हरिनाम सप्ताह भागवत कथा सोहळ्यास सुरुवात
वृत्त एकसत्ता न्यूज
आकाश भाग्यवंत नायकुडे
मुंबई दिनांक 04/04/2025 : श्रीराम पेठ पांगरी (तालुका बार्शी, जिल्हा सोलापूर) येथील श्रीराम मंदिर मठ मध्ये श्रीराम नवमी निमित्त अखंड हरिनाम सप्ताह भागवत कथा सोहळ्याची सुरुवात मंगळवार दिनांक 1 एप्रिल2025 पासून झाली. 1 एप्रिल ते 7 एप्रिल या कालावधीमध्ये संपन्न होत असलेल्या अखंड हरिनाम सप्ताह मध्ये प्रारंभीचे कीर्तन ह.भ. प. नारायण (भाऊ) महाराज उत्त्रेश्वर (पिंपरीकर) यांचे तर दिनांक 2 व 3 रोजी अनुक्रमे ह. भ. प. सुधाकर महाराज इंगळे (सोलापूर), ह. भ. प. काकासाहेब महाराज पाटील (दारफळ) यांची कीर्तन सेवा झाली. आज ( दि.4)चौथ्या दिवशी ह. भ. प. राजन महाराज काशीद (पिंपरी) यांची कीर्तन सेवा होऊन शनिवारी ह. भ. प. माधव महाराज बोधले (गौर) रविवारी ह.भ.प. ज्ञानेश्वर माऊली महाराज काकडे (ज्ञानेश्वरी कंठस्थ) आणि सोमवार दिनांक 7 एप्रिल रोजी सकाळी 10 ते 12 या वेळेत ह. भ. प. नारायण बोधले महाराज( गौर) यांचे काल्याचे किर्तन होणार आहे. त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आल्याचे संयोजक श्रीराम तरुण मंडळ पांगरी यांच्या वतीने सांगण्यात आले.
सप्ताहाचे हे 25 वे वर्ष असून पहाटे 4 ते 6 काकडा आरती, सकाळी 8 ते 10 ज्ञानेश्वरी पारायण, सकाळी 10 ते 12 गाथा भजन, दुपारी 12 ते 3 शिवशक्ती महिला भजनी मंडळ पांगरी यांचे भजन, दुपारी 3 ते 6 भागवत कथा, सायंकाळी 6 ते 7 हरिपाठ, रात्री 9 ते 11 कीर्तन, रात्री 11 ते पहाटे 4 हरिजागर अशा पद्धतीने दैनंदिन कार्यक्रम होत आहे.
संत शिवाजी महाराज बोधले, संत मानकोजी महाराज बोधले यांचे आशीर्वाद आणि ह.भ.प. नारायण बोधले महाराज बोरकर यांचे प्रेरणा व मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताह मध्ये गाथा पूजन, कलश पूजन, विना पूजन, टाळ पूजन करण्यात आले.
सोमवार दिनांक 7 रोजी सायंकाळी नऊ वाजता ह भ प रघुनाथ बिराजदार बिदर, ह भ प संभाजी जरे निलंगा, ह भ प दिनकर आवताडे मोहोळ, ह भ प तानाजी मदने (पुळुजवाडी पंढरपूर) यांच्या जुगलबंदी भारुडाचा कार्यक्रम होणार आहे.
भागवत कथा सोहळा : दररोज संध्याकाळी तीन ते सहा या कालावधीमध्ये हभप रामायणाचार्य विनोदजी महाराज कुलकर्णी बावी, गायक ह भ प सिताराम महाराज कदम, हार्मोनियम गुलाब महाराज सोनवणे, तबला अभिजीत कदम
रविवार दिनांक सहा रोजी सकाळी सात ते अकरा वाजता श्रीराम तरुण मंडळ श्रीराम तरुण मित्र मंडळाच्या वतीने श्रीराम पालखी सोहळा होणार आहे. सुरू असलेल्या या अखंड हरिनाम सोहळ्यामध्ये चंद्रकांत जाधव 9604233175, अरविंद चव्हाण 9881241894, एकनाथ पवार 8975732698, रमेश पवार 9359938981, बळीराम लाडे 87 67 26 11 49 यांच्याशी संपर्क साधावा.
निवृत्ती सुब्राव जाधव, साहेबराव नारायण पवार, सिताजी रामा गवळी, विलास मुरलीधर जाधव, कल्याण राजाराम निंबाळकर, बन्सीलाल मनोहर भोसले, अनिरुद्ध अशोक पवार यांचा संयुक्तपणे काल्याचा महाप्रसाद होईल. आज शुक्रवारी अंकुश रामा गवळी यांच्या तर्फे सकाळचे अन्नदान झाले तर संध्याकाळी नानासाहेब राजेंद्र गायकवाड यांचे अन्नदान होईल.
आज दुपारी अंकुश रामा गवळी अविनाश अंकुश गवळी आणि सेवा जेष्ठ पत्रकार भाग्यवंत लक्ष्मणराव नायकुडे यांच्या हस्ते सप्ताह सोहळ्याच्या ठिकाणी आणि मंदिरामध्ये पूजन होऊन नैवेद्य दाखविण्यात आला.
0 टिप्पण्या