विचारधारा

 

विचारधारा

वृत्त एकसत्ता न्यूज

संकलन: आकाश भाग्यवंत नायकुडे

मुंबई दिनांक 04/04/2025 :

आपण परीक्षा जवळ आली की देवाला नमस्कार करतो. पेपर सोपे जाऊ दे, मला सगळे आठवू दे, चांगले मार्क्स मिळू दे अशा विविध मागण्या करतो. त्याबदली उपवास धरेन, नारळ फोडेन, तोरण वाहिन अशा अनेक गोष्टी कबूल करतो.

खरेच असे केल्याने पेपर सोपा जातो का? आठवते का सगळे? वर्षभर अभ्यास केला असेल तर नक्की सगळे आठवेल. चांगले मार्क्स पडतील पण अभ्यासच केला नसेल तर कसे आठवणार?

मुलांनो, जसे कर्म कराल तसे फळ मिळेल. देवावर श्रद्धा ठेवा. त्याला स्मरून आपली नित्य कर्तव्ये प्रामाणिकपणे करा. मग असे नवस बोलावे लागत नाहीत. अंधश्रद्धा ठेवून जर काही करत बसाल तर वेळ आणि मेहनत वाया घालवाल.

अभ्यास, कष्ट, सराव या गोष्टी नियमित असतील तर देवाचे फक्त आशीर्वाद पुरे होतील आणि तेच महत्त्वाचे असतात.


सौ. स्नेहलता स. जगताप

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या