🟣 कै.यशवंतराव पाटील यांच्या पहिल्या स्मृतिदिनानिमित्त सुर्योदय वृद्धाश्रमात पुरस्कार वितरण सोहळा संपन्न
वृत्त एकसत्ता न्यूज
पुणे दिनांक 14/04/2025 : कै. यशवंतराव पाटील यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित सूर्योदय वृद्धाश्रम पुणे येथे अरुण पवार यांच्या अध्यक्षतेखाली आणि प्रमुख पाहुणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक इरफान शेख, यांचे उपस्थितीत
नुकताच पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम संपन्न झाला.
पुणे पोलीस सोसायटीचे सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रात नेहमीच पुढाकार घेऊन कार्यरत असणारी पुण्यातील आघाडीची संस्था म्हणजे कुसुमवात्सल्य फाउंडेशन संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा वैशाली पाटील या आहेत. पुणे पोलीस सोसायटीचे व्यवस्थापकीय संचालक बालाजी सातपुते, विशेष सहकार्य उद्योजिका चारूलता पुरोहित ह्यांनी केले,,प्रमोद गरुड, आदी मान्यवर उपस्थित होते.
संस्थेतर्फे विजय विठ्ठलराव जगदाळे, सूर्यकांत हरिभाऊ घोणे, सतीश प्रभाकर कालेकर, अशोक बाबुराव नीलकंठ व जगन्नाथ काळू महाजन या सर्वांना वरिष्ठ पोलीस निरीक्षक इरफान शेख यांच्या हस्ते राष्ट्रसेवा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
कार्यक्रमाचे निवेदन गायन रामेश्वर शिंदे यांनी केले तर आभार छाया भगत, अजय महाजन, यांनी मानले कुसुमवत्सल्य फाउंडेशनच्या वतीने अध्यक्ष, सचिव, संचालक, कार्याध्यक्ष व सर्व संस्था समिती यांचा हस्ते सत्कार करण्यात आला.
आश्रमात कार्यक्रम घेण्याचे एकच उद्धिस्ट होते की, आपल्या ओळखीच्या लोकांना आश्रम कळावा, आश्रमातील वृद्ध लोकांचे जीवन कळावे, त्यांच्या समस्या समजून घेता येतील तसेच त्यांना सर्वांची मदत मिळेल या उद्दात हेतूने कार्यक्रमासाठी आश्रमाची निवड करण्यात आल्याचे कुसुमवत्सल्य फाउंडेशनच्या अध्यक्षा वैशालीताई पाटील यांनी सांगितले.

0 टिप्पण्या