सहकार महर्षि अभियंत्रिकी महाविद्यालया मध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती साजरी

 

सहकार महर्षि अभियंत्रिकी महाविद्यालया मध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांची  जयंती साजरी 

वृत्त एक सत्ता न्यूज 

आकाश भाग्यवंत नायकुडे 

मुंबई दिनांक 16/4/2025 :

सहकार महर्षि शंकरराव मोहिते पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड रिसर्च, शंकरनगर- अकलूज या अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांची १९८ वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेचे पुजन महाविद्यालय विकास समितीचे संचालक वसंत जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी महाविद्यालयाचे कार्यालयीन अधीक्षक, महाविद्यालय समन्वयक, सर्व विभागाचे विभाग प्रमुख, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. त्यानंतर प्रथम वर्ष पदविका विभागप्रमुख व कार्यक्रमाचे समन्वयक प्रा. संजय झंजे  महात्मा ज्योतिबा फुले यांच्या कार्याची थोडक्यात माहीती दिली. सूत्रसंचालन तसेच आभार प्रदर्शन  प्रा.दिपक शिंदे यांनी केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या