🟢 विचारधारा 🔵

🟢 विचारधारा 🔵

वृत्त एकसत्ता न्यूज

संकलन : आकाश भाग्यवंत नायकुडे

मुंबई दिनांक 13/04/2025 :

आपण देव दर्शनासाठी मंदिरात जातो, तिथे देव दर्शन घेतो. देवाला काही सांगतो, काही चुकले असेल तर मान्य करतो देवाकडे काही मागतो, काही देण्याचे मान्य करतो, नवस करतो. यामध्ये देव तिथे आहे, आपले ऐकत आहे, आपल्याकडे पहात आहे हा भाव असतो, विश्वास असतो.

याच्या जोडीला देव सर्वत्र आहे, चराचरात आहे अशीही श्रद्धा आहे. देवदर्शनासाठी मंदिरातही जाण्याची गरज नाही. आहे तिथून नमस्कार केला तरी तो परमेश्वरचरणी पोहोचतो असेही काही लोक मानतात.

मुलांनो, असे जर असेल तर आपण ज्या काही बऱ्या-वाईट गोष्टी करतो त्या देवाला दिसत असतीलच की. मग आपल्याला त्याप्रमाणे फळ मिळणार. होय ना? त्यामुळे आपल्या सोबत कोणी असो नसो, कोणतेही कृत्य करताना देव पाहतोय याचे भान ठेवा.

जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देई रे ईश्वर!

हे विसरू नका.

सौ. स्नेहलता स. जगताप

                  संकलन : आकाश भाग्यवंत नायकुडे,

                                           मुंबई.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या