बघता बघता पन्नाशी आली की हो

बघता बघता पन्नाशी आली की हो 


अकलूज वैभव न्यूज नेटवर्क 

वृत्त एकसत्ता न्यूज

संकलन: आकाश भाग्यवंत नायकुडे

मुंबई दिनांक 08/04/2025 :

बघता बघता पन्नाशी आली की हो 

 आता 60पार करायचे की अमृत महोत्सव 75 करायचे हे परमेश्वराच्या हातात.  

 एक एप्रिल 1981 साली गुढीपाडवा होता त्या दिवशी तीस रुपये खर्च करून मी  वकिलीचा बोर्ड करून घेतला व वकिली व्यवसाय सुरूवात केली.

 "संकटे आजवरी आली थांबवू न आम्हा शकली" हे गीतातील वाक्य माझ्या व्यवसायाला पूर्णपणे लागू पडले. कोणत्याही सीनियर कडे ज्युनिअर शीप न करता मी स्वबळावर वकीली केली सुरू केली. 

चुका व शिका या पद्धतीने शिकत गेलो. चुका दुरुस्त केल्या व काम करत राहिलो. 

मी पूर्वी अभाविप व संघकार्य यात काम केल्यामुळे व माझे वडील कै एस व्ही कुलकर्णी यांच्या पुण्याईने मला पहिल्या दिवसापासून कामे आली व केली.

वकीली सुरू केल्यानंतर अवघ्या चार महिन्यात माननीय पंडित साहेब सारख्या कर्तव्य कठोर सत्र न्यायाधिशापुढे  काम करावयाची संधी मिळाली. 

मी प्रथम कामातील आनंद मग यशातील  व शेवटी फी तील  आनंद असा क्रम पाहून वकिली केली.

 गेल्या 45 वर्षात अनेक  जण माझ्याकडे ज्युनिअरशीप करण्यास आले. माझ्या  बुद्धीप्रमाणे त्यांना मी माझे असले नसलेले ज्ञान देण्याचा प्रयत्न केला. माझ्या जुनिअर पैकी अनेक जण वेगवेगळ्या कोर्टात जिल्हा न्यायाधीशापासून सिनीअर डिव्हीजन पदावर कार्यरत आहेत व पूर्ण क्षमतेने व प्रामाणिकपणांने आपले कर्तव्य बजावत आहेत. 

गेल्या पंचवीस वर्षात अपयश,नाराजी, निराशा जातीयवाद ईर्षा, द्वेष,अहंकार,अकारण शत्रुत्व या सर्वांना मी पूर्ण टक्कर देत काम केले आहे. 

एडवोकेट मकरंद कुलकर्णी, एडवोकेट रघुनाथराव लाटकर अशा प्रकाड पंडित वकिलांच्याकडून वेळोवेळी मार्गदर्शन घेत त्यांचे सल्ले मनापासून ऐकत मी कामकाज केले. त्यांच्याबद्दल तर मी कृतज्ञच आहे.

 व्यवसायावरती तीन वर्षांपूर्वी " मे जा व्हावे" हे पुस्तक लिहिले आता 'वकिली कथा व व्यथा','न्यायवैद्यक शास्त्र' मराठीतून ही दोन पुस्तके अंतिम टप्प्यावर आली आहेत. यथावकाश प्रकाशित करीन.

 45 वर्षे सलग पणे अनेक संकटातून  हसत खेळत उमेदीने मी वकील केली आहे. लेखाच्या सुरुवातीला मी बघता पन्नाशी आली की माझ्या वकीलीची 60    की अमृत महोत्सव हा पार पाडणे परमेश्वराच्या हातात आहे. 

त्या परंमपित्या परमेश्वराला मी अजून अनेक वर्षे कार्यक्षमतेने वकिली करावी व तशी मला संधी मिळाली अशी प्रार्थना करत असतो. 

 *कृतज्ञ आहे 

अनेक तज्ञ , न्याय खात्यातील कर्मचारी, माझे सहकारी वकील,वकिलीतील माझे गुरु,माझे सर्व ज्युनिअर सहकारी,माझे सर्व पक्षकार व ही सर्व न्याय यंत्रणा याबद्दल माझ्या मनात अपरंपार कृतज्ञता आहे. सर्व ज्ञात अज्ञात उपकार कर्त्यांच्या बद्दल कृतज्ञता व्यक्त करून आणखीन किमान सतरा वर्षे वकिली करायचा माझा मानस आहे. परमेश्वर मला तशी संधी देईलच व आपणा सर्वांचे सदिच्छा माझ्या पाठीशी आहेतच. 

 एडवोकेट अनिल रुईकर 

98 232 55049

 इचलकरंजी




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या