🟣 लांडगा सदृश्य वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात ११ बकरी ठार ४ गंभीर जखमी 🟡 यशवंत क्रांती संघटनेची तात्काळ मदत

🟣 लांडगा सदृश्य वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात ११ बकरी ठार ४ गंभीर जखमी

  🟡 यशवंत क्रांती संघटनेची तात्काळ मदत

वृत्त एकसत्ता न्यूज

आकाश भाग्यवंत नायकुडे

मुंबई दिनांक 07/04/2025 : लांडगा सदृश्य वन्यप्राण्यांनी केलेल्या हल्ल्यात शेंडुर (ता.कागल) येथे  बाळू सूर्याप्पा बंडगर (मु.पो. शेंडुर ता. कागल) मेंढपाळाची ११ बकरी ठार तर ४ गंभीर जखमी व ४ बेपत्ता आहेत. हा हल्ला ३ एप्रिल रोजी संध्याकाळी ७.३० ते ८ वाजण्याच्या  झाला. या घटनेमुळे मेंढपाळाचे १५००००/- रू. आर्थिक  नुकसान झाले आहे.

       याबाबत माहिती अशी कि बाळू सूर्याप्पा बंडगर, मु.पो. शेंडुर ता. कागल जि. कोल्हापूर  येथील कायमचे रहिवासी असून ते त्यांच्या मेंढरांचा तळ  शेत मालक शांताबाई कदम यांच्या शेंडुर येथील (भावशाचे पठार) शेतात   खतासाठी बसायला आहे.दिनांक ३ एप्रिल २०२४ रोजी  संध्याकाळी ७.३० ते ८ वाजण्याच्या दरम्यान मेंढरांच्या तळावर लांडगा सदृश्य वन्यप्राण्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात ११ मेंढरांची कोकरे ठार ४ गंभीर जखमी झाले ३ बेपत्ता आहेत. यशवंत क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संजय वाघमोडे, यांना मेंढपाळ बाळू बंडगर व संभाजी हजारे यांच्याकडून हल्ल्याची घटना कळताच त्यांनी संबंधितांना फोन करून पंचनाम्याबाबत विनंती केली. 

     वनपाल आप्पासाहेब भुरटे, वनरक्षक सागर पांढरे, वन सेवक रवींद्र पवार, यांनी घटनास्थळी उपस्थित राहून घटना स्थळाचा पंचनामा केला. डाँ सचिन काशीनाथ माने पशुवैद्यकीय पर्यवेक्षक व डाँ सागर जाधव सावर्डे बुद्रुक, यांनी मृत कोकरांचे शवविच्छेदन केले यावेळी, कोल्हापूर जिल्हाध्यक्ष आप्पाजी मेटकर, जिल्हा उपाध्यक्ष अमोल मेटकर, संभाजी हजारे, शाखा अध्यक्ष राजाराम हजारे शेंडुर शाखा पदाधिकारी मेंढपाळ उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या