"जेवढा प्रपंच मोठा तेवढा परमार्थ मोठा"- ह भ प गणेशानंद महाराज धुमाळ
वृत्त एकसत्ता न्यूज
आकाश भाग्यवंत नायकुडे
मुंबई दिनांक 06/04/2025 : "जेवढा प्रपंच मोठा तेवढा परमार्थ मोठा" असे मत ह भ प गणेशानंद महाराज धुमाळ (देशमुख वाडी तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर) यांनी देशमुख वस्ती 61 फाटा माळशिरस येथे किर्तन सेवेत व्यक्त केले.
श्रीराम नवमी चे औचित साधून कै. विलास मारुती देशमुख यांच्या तृतीय पुण्यस्मरण दिनानिमित्त देशमुख परिवाराच्या वतीने रविवारी सकाळी दहा ते बारा या वेळेत आयोजित केलेल्या फुलाचे कीर्तन सांगताना ते व्यक्त झाले.
किर्तन सेवा करताना ते पुढे म्हणाले की, मानवी आयुष्यामध्ये प्रत्येकाने प्रपंच मोठा केलाच पाहिजे. ज्याचा प्रपंच मोठा त्याचा परमार्थही मोठा होतो. पण हे सर्व करताना खिशामध्ये पैशांचा खळखळाट जरूर होऊ द्या पण त्यात कोणाचाही तळतळाट नसावा. ज्याला राजकारण करायचे आहे त्याने महाभारत वाचावे आणि ज्याला लग्न करायचे आहे यथार्थ जीवन जगायचे आहे त्यांनी रामायण वाचावे असं सल्ला आपल्या कीर्तन सेवेच्या माध्यमातून नव्या पिढीसाठी त्यांनी दिला. आपल्या ओघवत्या शैलीतील पहाडी आणि भारदस्त आवाजाने समस्त श्रोत्यांना त्यांनी मंत्रमुग्ध करून सोडले. कीर्तन सेवेनंतर आरती होऊन देशमुख परिवाराच्या वतीने उपस्थितांना महाप्रसाद पंगत संपन्न झाली.
0 टिप्पण्या