सुपरनोव्हामुळे 23 अब्ज वर्षांनंतर उजळणार आकाशगंगा!
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलन: आकाश भाग्यवंत नायकुडे
मुंबई दिनांक 10/04/2025 : वॉशिंग्टन डीसी : वैज्ञानिकांनी १५० प्रकाशवर्ष दूर दोन पांढर्या बुटक्या तार्यांची एक दुर्मीळ जोडी शोधली आहे. येत्या २३ अब्ज वर्षांत हे तारे एकमेकांवर आदळून एका ‘टाईप ला’ सुपरनोव्हा स्फोटात परिवर्तित होतील. हा स्फोट इतका तीव— आणि प्रकाशमान असेल की, तो चंद्राच्या उजेडापेक्षा १० पट अधिक चमकेल आणि संपूर्ण आकाशगंगेला काही क्षणांसाठी उजळून टाकेल. नेचर अॅस्ट्रॉनॉमी जर्नलमध्ये याबाबतचा शोधनिबंध प्रसिद्ध झाला आहे.
हे दोन पांढरे बुटके तारे एका बायनरी सिस्टीमचा भाग आहेत. जे हळूहळू एकमेकांकडे खेचले जात आहेत. त्यांचे एकूण वस्तुमान सूर्याच्या १.५६ पट अधिक असून, त्यामुळे ते सुपरनोव्हा होण्यासाठी आदर्श स्थितीत आहेत. सध्या हे तारे १४ तासांत एकमेकांची प्रदक्षिणा पूर्ण करतात. पण, २३ अब्ज वर्षांनी जेव्हा ते एकमेकांवर आदळतील. तेव्हा त्यांची गती इतकी वाढलेली असेल की, ३०-४० सेकंदांतच एक परिक्रमा पूर्ण करतील.‘टाईप ला’ सुपरनोव्हा हा एक विशेष प्रकारचा तार्यांचा स्फोट आहे. जो तेव्हा घडतो जेव्हा एका पांढर्या बुटक्या तार्याने आपल्या जोडीदार तार्याचे भरपूर वस्तुमान (मास) खेचून घेतले असते आणि तो अखेरीस त्याच्यावर आदळतो. हा स्फोट इतका प्रचंड असतो की, काही काळासाठी संपूर्ण आकाशगंगा चमकून जाते. आपल्या मिल्की वे आकाशगंगेत असे सुपरनोव्हा स्फोट साधारणपणे ५०० वर्षांत एकदा घडतात.
वैज्ञानिकांच्या मते, हा महाकाय स्फोट चार टप्प्यांत होईल : पहिला धमाका : एक तारा दुसर्याच्या वस्तुमानावर झडप घालेल आणि त्याच्या पृष्ठभागावर प्रथम लहानसा स्फोट होईल. दुसरा धमाका : पहिल्या तार्याचे कोर तुटून त्यातील गॅस आणि पदार्थ सर्व दिशांना उडतील. तिसरा आणि चौथा धमाका : हे पदार्थ दुसऱ्या ताऱ्यावर आदळतील आणि पुन्हा एक मोठा स्फोट होईल. अ़तिम महास्फोट : दोन्ही तारे पूर्णपणे नष्ट होतील आणि एक महाप्रचंड सुपरनोव्हा निर्माण होईल. ही ऊर्जा मानवाने तयार केलेल्या सर्वात शक्तिशाली अणुबॉम्बच्या तुलनेत हजार ट्रिलियन पटीने अधिक असेल.
ही घटना २३ अब्ज वर्षांनंतर घडणार आहे. तोपर्यंत आपली आकाशगंगा देखील अस्तित्वात असेल की नाही, हे निश्चित नाही. पृथ्वीला याचा कोणताही धोका नाही. कारण हा स्फोट आपल्या ग्रहापासून अत्यंत लांब आहे. मात्र जेव्हा हा स्फोट होईल, तेव्हा तो आकाशात ग्रहांमध्ये सर्वात मोठा ज्युपिटरपेक्षा २ लाख पट अधिक तेजस्वी दिसेल. या शोधामुळे वैज्ञानिकांना सुपरनोव्हा स्फोटांच्या निर्मिती आणि आकाशगंगेतील महत्त्वाच्या प्रक्रियांबददल अधिक माहिती मिळू शकते. तसेच अशा स्फोटांमुळे नवीन तारे आणि ग्रह जन्माला येतात. त्यामुळे हे भविष्याचे एक आशादायक संकेतही असू शकतात.

0 टिप्पण्या