🟠 ओंकार साखर कारखाना परिवारातर्फे वन विभागाला 2 चार चाकी गाङ्या भेट
🟣 परिवाराची सामाजिक बांधलकी
वृत्त एकसत्ता न्यूज
आकाश भाग्यवंत नायकुडे
मुंबई दिनांक 02/04/2025 : ऊस बागायत पट्यात बिबट्या, तरस यांनी उच्छांद मांङला आहे. त्यामुळेच शेतकरी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. हे बिबट्ये व तरस पाळीव प्राण्यांवर हल्ला करून मारून टाकतात शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. याची जाणिव झाल्याने वनविभागाकङे राञीच्या गस्त घालण्यासाठी व वेळेत घटनास्थळी पोहचण्यासाठी अत्याधुनिक गाङ्या आसाव्यात या उद्देशाने दोन महिंद्र कंपनीच्या बोलेरो गाङ्या ओंकार परिवाकङुन चेरअमन बाबुराव बोत्रे-पाटील यांच्या हस्ते मुख्य वनरक्षक तुषार चव्हाण, उप वनरक्षक पंकज गर्ग, सोलापूर वन विभाग राम धोञे, सामाजिक वनीकरणाच्या स्नेहल पाटील यांना भेट देण्यात आल्या. वनभवन येथे संपन्न झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी ओंकार साखर कारखान्याचे जनरल मॅनेजर वैभव काशीद, वनविभागाचे आधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
ओंकार साखर कारखाना परिवाराने नेहमीच सामाजीक बांधलकीत अग्रेसर राहण्याचा प्रयत्न केला आहे. ओंकार साखर कारखाना परिवाराचे चेअरमन बाबुराव बोत्रे-पाटील, संचालिक रेखाताई बोत्रे-पाटील, संचालक प्रशांतराव बोत्रे-पाटील, ओमराजे बोत्रे-पाटील यांच्या मार्गदर्शकनाखाली परिवाराचे वटवृक्षात रूपांतर होत असताना अगदी सुरुवातीपासून सामाजिक हित ङोळयासमोर ठेवून वृक्षारोपण, विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप, अनाथांना अन्नधान्य किटचे वाटप, जि. प. शाळांना आर्थिक मदत केली आहे.
"ओंकार साखर कारखाना परिवाराकङुन शेतकरी व समाजहिताला नेहमीच प्रधान्य दिले जाईल"- बाबुराव बोत्रे-पाटील.
0 टिप्पण्या