🟩 अकलूज कृषी उत्पन्न बाजार समिती राज्यात टॉप 10 मध्ये

🟩 अकलूज कृषी उत्पन्न बाजार समिती राज्यात टॉप 10 मध्ये 

वृत्त एकसत्ता न्यूज

आकाश भाग्यवंत नायकुडे

मुंबई दिनांक 24/04/2025 : महाराष्ट्रातील कृषी उत्पन्न बाजार समिती यांच्या आर्थिक वर्ष 2023 - 24 मधील कामगिरीच्या आधारे राज्य शासनाने जाहीर केलेल्या वार्षिक क्रमवारीत मदनसिंह शंकरराव मोहिते पाटील सभापती असलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीने आठवा क्रमांक पटकावून राज्यातील टॉप 10 बाजार समितीमध्ये आपले स्थान मिळवले आहे. ही माहिती पणन संचालक विकास रसाळ यांनी प्रसिद्धी केलेल्या पत्रकातून देण्यात आली आहे. राज्यातील एकूण 305 बाजार समित्यांपैकी हिंगणघाट जिल्हा वर्धा बाजार समितीने प्रथम क्रमांक मिळविला कारंजा लाड दुसऱ्या तर बारामती कृषी उत्पन्न बाजार समिती  तिसऱ्या क्रमांकावर आहे. विशेष म्हणजे आर्थिक उलाढाली मध्ये आघाडीवर असलेल्या मुंबई व पुणे बाजार समिती यांना यावर्षी टॉप 10  मध्ये स्थान मिळाले नाही. शेतमाल विक्री व्यवस्थेतील पायाभूत सुविधा आर्थिक व कायदेशीर कारभार विविध योजना व उपक्रमात सहभागी आधी 35 निकषावर ही विक्रम क्रमवारी आधारित असून त्यासाठी 200 गुणांची मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. खाजगी बाजारांसाठी 40 निकषांवर  250 गुणांचे मूल्यमापन करण्यात आले. बाजार समितीच्या क्रमवारीमुळे शेतकऱ्यांना आपला शेतमाल कोणत्या बाजारत विक्रीसाठी न्यावा याचा स्पष्ट अंदाज येणार आहे त्याचप्रमाणे बाजार समितीमध्ये कार्यरत संचालक मंडळांना ही भविष्यात कोणत्या बाबींना प्राधान्य द्यावे याचे धोरणात्मक मार्गदर्शन मिळणार आहे.

अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीने संपादित केलेल्या यशाबद्दल सभापती मदनसिंह मोहिते पाटील, संचालक मंडळ आणि कर्मचारी वर्ग यांचे वर अभिनंदनाचा वर्षाव सुरू आहे.

  "अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीने उत्तम कामकाज करून राज्यामध्ये टॉप 10 मध्ये आपले स्थान निर्माण केले याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे" अशा शब्दांमध्ये  अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मदनसिंह शंकरराव मोहिते पाटील यांचे, शरद जोशी विचार मंच शेतकरी संघटना महासंघाचे महाराष्ट्र राज्य संपर्क व प्रसिद्धीप्रमुख तसेच नॅशनल युनियन बॅकवर्ड एस सी एसटी अँड मायनॉरिटी महासंघ नवी दिल्ली अर्थात एनयूबीसी प्रदेश उपाध्यक्ष सेवा जेष्ठ पत्रकार भाग्यवंत लक्ष्मणराव नायकुडे यांनी अभिनंदन करून भावी वाटचालीतील उत्तरोत्तर प्रगतीसाठी हार्दिक शुभेच्छा व्यक्त केल्या.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या