सहकार महर्षि साखर कारखान्यामध्ये औद्योगिक सुरक्षितता सप्ताहाचे आयोजन
वृत्त एकसत्ता न्यूज
आकाश भाग्यवंत नायकुडे
मुंबई दिनांक 07/03/2025 : अकलूज येथील सहकार महर्षि शंकरराव मोहिते-पाटील सहकारी साखर कारखान्यामध्ये औद्योगिक सुरक्षितता सप्ताह दि. 4 मार्च 2025 ते 11 मार्च 2025 या कालावधीमध्ये आयोजन करण्यात आलेल असून सदर औद्योगिक सुरक्षितता सप्ताहाचे उदघाटन राष्ट्रीय सुरक्षा दिन मंगळवार दि. 4 मार्च 2025 रोजी सकाळी 10.00 वाजता कारखान्याचे इन्चार्ज शेतकी अधिकारी आर.एस.चव्हाण यांचे हस्ते संपन्न झाले.
सदर प्रसंगी कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष सहकार महर्षिं शंकरराव नारायणराव मोहिते-पाटील व आक्कासाहेब यांचे प्रतिमेचे पूजन करणेत येऊन, सुरक्षितता सप्ताहास प्रारंभ करण्यात आला. यावेळी कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले अधिकारी, कर्मचारी यांना डेप्युटी चिफ् इंजिनिअर-एस.पी.पताळे यांनी एकत्रितपणे सुरक्षिततेची शपथ दिली.
कारखान्याचे मार्गदर्शक व महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील व चेअरमन जयसिंह मोहिते-पाटील यांचे कुशल नेतृत्वाखाली कारखाना प्रगतीपथावर कार्यरत असून कारखान्याने राज्यपातळीवर व देशपातळीवरील विविध पुरस्कार मिळवणारा कारखाना म्हणून ख्याती मिळविलेली आहे.
त्यानंतर सेफ्टी ऑफिसर पी.बी. रणनवरे यांनी कामगारांनी काम करताना काय व कशी दक्षता घ्यावी, कामगाराचे हित व कारखान्याचे हित कसे जोपासावे, विविध विभागातील अडचणींबाबत मार्गदर्शन करून सुरक्षितता विभागामार्फत कामगारांना दिलेली सुरक्षा साधने याचा कसा वापर करावा याबाबतच्या मार्गदर्शन केले. त्यावेळी सुरक्षितताबाबतच्या व्हिडिओ फिल्म दाखवुन कामगारांना माहिती देण्यात आली.
त्यानंतर कारखान्याचे चिफ् इंजिनिअर व फॅक्टरी मॅनेजर एस.के.गोडसे यांनी कारखान्यामध्ये काम करत असताना कामगारांनी सुरक्षितता साधनांचा वापर करुन कोणत्याही प्रकारचा अपघात होणार नाही याची दक्षता घेणे बाबत आवाहन केले व सदर कालावधीमध्ये फायर ट्रेनिंग, पर्यावरण व औद्योगिक सुरक्षिततेबाबतची माहिती दिली जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
त्यावेळी उपस्थित कारखान्याचे अधिकारी यांचे शुभहस्ते निबंध, चारोळी व घोषवाक्य स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना बक्षिस वितरण केले. निबंध लेखन प्रथम क्रमांक जे.पी.साठे (को-जन), द्वितीय .आर.टी. दौलतोडे (इंजिनिअरींग), तृतीय पी.के.पवार (टाईम ऑफिस), चारोळी लेखन प्रथम क्रमांक एस.आर.कुंभार (शेती), द्वितीय व्ही.पी.कुंभार (परचेस), तृतीय डी.एस.चव्हाण (डिस्टीलरी) तसेच घोषवाक्य लेखन प्रथम क्रमांक एस.जी.दोशी (ऍ़.असिड), द्वितीय व्ही.आर.दुरणे (परचेस), तृत्तीय व्ही.एच.वाघ (ऍ़.ऍ़सिड) यांना प्रशस्तीपत्र व बक्षिस देवून सन्मानित करणेत आले.
सदर कार्यक्रमास कारखान्याचे कार्यलक्षी संचालक आर.डी. रणनवरे, परचेस ऑफिसर आर.एस.गायकवाड, लेबर ऍ़न्ड वेलफेअर ऑफिसर एस.एम.साळुंखे, हेड टाईम किपर- व्ही.आर.वाघ, पर्यावरण अधिकारी- पी.एच.इनामदार, इन्चार्ज कॉम्प्युटर प्रोग्रॅमर एस.जी.नरसाळे, सिक्युरिटी ऑफिसर एन.सी.निंबाळकर व कारखान्याचे सर्व कामगार तसेच युनियन प्रतिनिधी उपस्थित होते. कार्यक्रमाचे स्वागत व सुत्रसंचालन गजानन पिसे यांनी केले.
फोटो- अतुल बोबडे (शिवकिर्ती फोटो स्टुडिओ)
0 टिप्पण्या