राज्यस्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत प्रथमेश तानाजी माने देशमुख द्वितीय

 

राज्यस्तरीय  वेटलिफ्टिंग स्पर्धेत प्रथमेश तानाजी माने देशमुख द्वितीय

वृत्त एकसत्ता न्यूज

आकाश भाग्यवंत नायकुडे

मुंबई दिनांक 06/03/2025 :  

सहकार महर्षि शंकरराव मोहिते पाटील इन्स्टिटयूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड रिसर्च, शंकरनगर - अकलूज या अभियांत्रिकी महाविद्यालयातील पदवीका मेकॅनिकल विभागातील तृतीय वर्षामधील विद्यार्थी प्रथमेश तानाजी माने देशमुख यांने वेटलिफ्टिंग स्पर्देत ८५ किलो वजनी गटामध्ये राज्यात द्वितीय क्रमांक मिळवल्याची माहिती महाविद्यालाचे प्राचार्य डॉ. प्रवीण ढवळे यांनी दिली.

राजगड ज्ञानपीठ टेक्निकल कॅम्पस, पॉलिटेक्निक धांगवडी, पुणे या ठिकाणी आंतर पदविका विद्यार्थी स्पोर्ट्स असोसिएशन (IEDSSA) मार्फत राज्यस्तरीय  वेटलिफ्टिंग व कुस्ती स्पर्धा दि. ५ मार्च रोजी संपन्न झाली. त्यामध्ये द्वितीय क्रमांकाचे यश प्राप्त केल्याबद्दल प्रथमेश माने देशमुख याचे महाविद्यालय ट्रस्टचे अध्यक्ष  जयसिंह शंकरराव मोहिते पाटील, महाविद्यालय विकास समिती अध्यक्षा कु. स्वरूपाराणी जयसिंह मोहिते पाटील, ट्रस्टचे सचिव राजेंद्र चौगुले व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रवीण ढवळे, यांनी अभिनंदन केले. व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तसेच क्रिडा समन्वयक प्रा. देशमुख आर.एन., प्रा.शेंडगे एम.जे. व विभाग प्रमुख प्रा. निकम एस. एम. यांचे मार्गदर्शन लाभले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या