सद्गुरु गहिनीनाथ अर्बन को-ऑपरेटिव बँकेस प्रथम क्रमांकाचा आदर्श बँक पुरस्कार

सद्गुरु गहिनीनाथ अर्बन को-ऑपरेटिव बँकेस प्रथम क्रमांकाचा आदर्श बँक पुरस्कार

वृत्त एकसत्ता न्यूज

आकाश भाग्यवंत नायकुडे

मुंबई दिनांक 04/03/2025 :  सोलापूर जिल्हा नागरी सहकारी बँक असोसिएशन सोलापूर तर्फे अकलूज (तालुका माळशिरस) येथील सद्गुरु गहिनीनाथ अर्बन को-ऑपरेटिव बँकेस प्रथम क्रमांकाचा "आदर्श बँक" पुरस्कार प्रदान करण्यात आला. सोलापूर जिल्ह्यातील सहकारी बँकांना मागील तीन वर्षाच्या आर्थिक परिस्थितीचा आढावा घेऊन पुरस्कार दिला जातो. सोलापूर येथे संपन्न झालेल्या समारंभामध्ये दि महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक फेडरेशन मुंबई अध्यक्ष अजय ब्रम्हेचा, सोलापूर जिल्हा उपनिबंधक किरण गायकवाड, शहर उत्तरचे आमदार विजयकुमार देशमुख, शहर मध्ये चे आमदार देवेंद्र कोठे, सोलापूर जिल्हा नागरी सहकारी बँक असोसिएशनचे अध्यक्ष प्रकाश वाले यांच्या हस्ते अकलूज येथील सद्गुरु गहिनीनाथ अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेस आदर्श बँक या प्रथम पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. बँकेस 50 कोटी पर्यंत ठेवी असलेल्या विभागात प्रथम क्रमांकाचा पुरस्कार मिळाला असून हा पुरस्कार  बँकेचे चेअरमन डॉक्टर अरविंद गांधी, व्हाईस चेअरमन ऍड. शिरीष फडे, बँकेचे संचालक अजित गांधी, भरतेश वैद्य, निलेश गिरमे व बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नंदकुमार गोरे यांनी  स्वीकारला. बँकेचे चेअरमन डॉक्टर अरविंद गांधी यांनी सांगितले की बँकेच्या उत्तम आर्थिक परिस्थितीमुळे व बँकेचे सर्व संचालक, कर्मचारी, सभासद व ग्राहक यांच्या सहकार्यानेच बँकेस हा पुरस्कार मिळाला आहे. बँकेच्या आर्थिक स्थितीवर आधारित हा पुरस्कार प्रदान करण्यात आला असून मार्च 2024 अखेर बँकेच्या रुपये 35 कोटी ठेवी असून 18.50 लाख कर्ज वाटप आहे. बँकेचा नेट एनपीए 0% असून रुपये 38.17 लाख इतका नफा झालेला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या