स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक यांचे प्रात्यक्षिक प्रशिक्षण संपन्न
वृत्त एकसत्ता न्यूज
आकाश भाग्यवंत नायकुडे
मुंबई दिनांक 30/03/2025 : सहकार महर्षि शंकरराव मोहिते पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड रिसर्च शंकरनगर अकलूज या अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये महाविद्यालय विकास समिती अध्यक्षा कु. स्वरूपाराणी जयसिंह मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सार्वजनिक बांधकाम विभाग अकलूज कार्यालयातील स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक यांचे प्रात्यक्षिक प्रशिक्षण संपन्न झाल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रवीण ढवळे यांनी दिली.
प्रात्यक्षिक प्रशिक्षण हे सहकार महर्षि अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये स्थापत्य अभियांत्रिकी विभागातील प्रयोगशाळेमध्ये सुनिता पाटील (कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग अकलूज) यांनी त्यांच्या कार्यालयातील स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक कर्मचाऱ्यांना दिले. त्यामध्ये सिमेंट गुणवत्ता चाचण्या, खडीचे वर्गीकरण चाचणी, काँक्रीट गुणवत्ता व क्षमता यांच्या चाचण्या, डांबर गुणवत्ता चाचणी, बांधकाम मजबुती अहवाल यांचे प्रात्यक्षिक प्रशिक्षण दाखवण्यात आले. त्यामुळे याचा उपयोग बांधकाम विभागातील गुणवत्ता वाढीसाठी होऊ शकतो. तसेच महाविद्यालयांमध्ये असणाऱ्या सर्व सुविधा ग्रंथालय, अत्याधुनिक प्रयोगशाळा, मुलांचे व मुलींचे सुसज्ज वस्तीगृह या सर्व सुविधा ने महाविद्यालय परिपूर्ण असल्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना चांगल्या सुविधा मिळत आहेत असा विश्वास व्यक्त केला व संस्थापकांचे, प्राचार्यांचे, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे कौतुक केले. या सर्व सुविधामुळे महाविद्यालयाला राष्ट्रीय मूल्यांकन "ए" श्रेणी मिळाली असे त्यांनी सांगितले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
सदर प्रशिक्षणाच्या आयोजनाचे काम स्थापत्य अभियांत्रिकी विभाग प्रमुख प्रा. फुले एस. एन. व प्रा.रिसवडकर व्ही. एस. यांनी पाहिले.

0 टिप्पण्या