पदोन्नती झाल्या बद्दल सन्मान
अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
वृत्त एकसत्ता न्यूज
भाग्यवंत लक्ष्मण नायकुडे
नवी दिल्ली दिनांक 09/02/2025 : प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या वतीने सीनियर बँक इन्स्पेक्टर सुखदेव खंडागळे, शाखाधिकारी संजय बडे यांची पदोन्नती झाल्या बद्दल सन्मान करण्यात आला.
सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत सीनियर बँक इन्स्पेक्टरपदी सुखदेव खंडागळे यांची तसेच मार्केट यार्ड शाखेच्या शाखाधिकारीपदी संजय बडे यांची पदोन्नती झाल्या बद्दल प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष सोमनाथ खंडागळे व उपाध्यक्ष शशिकांत कडबाने यांनी सत्कार करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी बँकेतील सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

0 टिप्पण्या