"पालकांनी मुलांचे शिक्षण आणि आदर्श संस्काराचे ध्येय ठेवावे" - मदनसिंह मोहिते-पाटील

"पालकांनी मुलांचे शिक्षण आणि आदर्श संस्काराचे ध्येय ठेवावे" - मदनसिंह मोहिते-पाटील

वृत्त एकसत्ता न्यूज

नवी दिल्ली येथून

 भाग्यवंत लक्ष्मण नायकुडे

 दिनांक 10/02/2025 : "सध्याच्या काळात आदर्श समाज घडविण्यासाठी ऊच्च शिक्षणाची गरज आहे. पालकांनी आपल्या मुलांना ऊच्च शिक्षण देवुन आदर्श संस्काराचे ध्ये ठेवले तरच त्यांचे आणि समाजाचे भविष्य उज्वल होईल. त्यामुळे पालकांनी मुलांचे शिक्षण आणि आदर्श संस्काराचे ध्येय ठेवावे" असे मत अकलूज कृषी ऊत्पन्न बाजार समिती सभापती मदनसिंह मोहिते-पाटील यांनी अकलूज (तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर) येथे "रूद्रा डेंटल क्लिनिक"चे उद्घाटन करताना व्यक्त केले. 

अकलूज येथे डॉक्टर सावन शिवाजी पालवे यांच्या "रूद्रा डेंटल क्लिनिक"चे उद्घाटन मदनसिंह मोहिते-पाटील यांचे हस्ते व डॉ. ‌एम.के.इनामदार, डॉ. निलेश फडे, डॉ. संतोष खडतरे, डॉ. किरण फडे, डॉ. संजय सिद, डॉ.ए.बी.आव्हाड यांचे प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले. याप्रसंगी सुमित्रा पतसंस्थेचे चेअरमन महादेव अंधारे, महर्षि प्रशालेचे मुख्याध्यापक संजय गळीतकर , डॉ प्रा.दत्तात्रय मगर, श्रीपुर - महाळूंगचे नगरसेवक प्रकाश नवगिरे, विक्रमसिंह लाटे, मौला पठाण,  दादासाहेब लाटे, पत्रकार बंधु, वअसंंख्य बालमित्र -मैत्रीणी, पत्रकार मित्र, आरोग्य सेवक-सेविका, व्यापारी बंधू यांनी शुभेच्छा दिल्या. 

🔰 "कठोर परिश्रमास पर्याय नाही" -डॉ. एम.के.इनामदार 

"समाज निरोगी आणि दिर्घायु करण्यासाठी डॉक्टर प्रमाणिक प्रयत्न करीत असतात.निरोगी समाजासाठी डॉक्टरांचे महत्वाचे योगदान असते.भविष्यात नवीन डॉ क्टर  निर्माण होणे  गरजेचे आहे.त्यासाठी मुलांनी कष्ट करण्याची गरज आहे, कारण आयुष्यात कठोर परिश्रमास पर्याय नाही".

पुढे बोलताना मोहिते-पाटील यांनी शिक्षणाचे महत्व सांगत शिक्षणामुळे जीवन आनंदी होते असे सांगितले.

तसेच आई-वडीलांना मुलांच्या भविष्याची काळजी असते.आपला मुलगा किंवा मुलगी ऊच्च शिक्षित होवुन समाजात आदर्श नागरीक म्हणून ओळखला जावा ही त्यांची धडपड पाहुन मुलांनीही अभ्यासावर लक्ष केंद्रीत करुन यशस्वी नागरिक बनण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पत्रकार कृष्णा लावंड, अजिनाथ आंधळे, प्रविण सावंत, अविनाश गायकवाड, आकाश मोरे, केतन लोखंडे यांनी परीश्रम घेतले.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन पत्रकार नागेश लोंढे यांनी केले तर आभार शिवाजी पालवे यांनी मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या